esakal | डाळिंब खरेदीसाठी उत्तर-दक्षिण भारतातील व्यापारी नगरमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

Traders from North-South India in Ahmednagar

जोरदार पावसाचा इतर राज्यातील डाळिंब बागांना फटका बसल्याने उत्पादनात घट झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तसेच उत्तर भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब येथील व्यापारी डाळिंब खरेदीसाठी येथे ठाण मांडून बसले आहेत.

डाळिंब खरेदीसाठी उत्तर-दक्षिण भारतातील व्यापारी नगरमध्ये

sakal_logo
By
दत्ता इंगळे

नगर तालुका ः सध्या देशात सफरचंदाचे भाव वाढल्याने, ग्राहक डाळिंबाकडे वळले आहेत. परिणामी, डाळिंबालाही चांगले दर मिळत आहेत. दादा पाटील शेळके बाजार समितीत लिलावात डाळिंबाला चांगला भाव मिळत असल्याने नगर जिल्ह्यासह औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, सोलापूर, पुणे येथील डाळिंबउत्पादक आपला माल विक्रीसाठी आणत आहेत. 

हेही वाचा - येथे ५० वर्षांपासून उभे आहे काँग्रेस नेत्याचे मंदिर

जोरदार पावसाचा इतर राज्यातील डाळिंब बागांना फटका बसल्याने उत्पादनात घट झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तसेच उत्तर भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब येथील व्यापारी डाळिंब खरेदीसाठी येथे ठाण मांडून बसले आहेत. नेप्ती उपबाजारात आज 11 हजार 700 क्रेट डाळिंबाची आवक झाली. लिलावात त्यास 50 ते 80 रुपये किलोचा भाव मिळाला. 


नेप्ती उपबाजारात डाळिंबाची आवक वाढत असून, डाळिंबउत्पादक व इतर राज्यातील व्यापारी खरेदीसाठी येत आहेत. सध्या 12 हजार क्रेट डाळिंबाची आवक होत असून, भावही चांगला मिळत आहे. आगामी काळात 25 हजार क्रेटपर्यंत डाळिंब बाजारात येईल. 
- संजय काळे, निरीक्षक, बाजार समिती 

नगरच्या बाजारात राज्यभरातील डाळिंब विक्रीसाठी येत आहेत. त्यास चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यावरील विश्‍वासामुळे नगरच्या बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. सध्या पुणे, मुंबई उपनगरासह राज्यातूनही डाळिंबाना चांगली मागणी आहे. 
- संतोष ढवळे, संचालक, साईराज फ्रूट कंपनी, नेप्ती उपबाजार 

संपादन - अशोक निंबाळकर