

Villagers in Kopargaon in shock after a four-year-old girl was killed by a leopard near her home; forest teams begin search operation.
sakal
कोपरगाव: तालुक्यातील टाकळी रोडवरील चर भागात ऊस तोडणीसाठी आलेल्या कुटुंबातील चार वर्षीय चिमुकली नंदिनी प्रेमदास चव्हाण हिच्यावर बिबट्याने झडप घालून तिला उलचून नेले. काही अंतरावर तिचा मृतदेह आढळून आला. ही घटना काल (ता.५) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. संतापलेल्या ग्रामस्थांनी शासनाचा निषेध करत नगर-मनमाड रस्त्यावर दोन तास रास्तारोको आंदोलन केले.