त्या अॅम्ब्युलन्समध्ये पेशंट नाही, निघालं भलतंच... पोलिसही झाले अवाक्

Transportation of alcohol by ambulance
Transportation of alcohol by ambulance

नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन आहे. त्यामुळे आवश्यक सेवेसाठी वाहनांना परवाने दिले आहेत. त्यातल्या त्यात कोणतीही स्थिती असली तरी अॅम्ब्युलन्स कोणी अडवत नाहीत. त्यामुळे त्याविषयी कोणाला संशय येण्याचे कारण नव्हते. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी आत डोकावून पाहिले तर पेशंट ऐवजी त्यांना भलतेच नजरेस पडले. त्यात उचकापाचक केल्यावर तर त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

आवश्‍यक वाचा नगरच्या महिलेचा जळगावमध्ये राडा 

अधिक माहिती अशी, शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील सिव्हिल कॉर्टर येथे काहीतरी काळंबेरं होत होतं. त्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक कृष्णा घायवट, समाधान सोळंके यांच्या पथकाने आज दुपारी छापा घातला. त्या वेळी सिव्हिल कॉर्टर येथील पाण्याच्या टाकीजवळ वीरू गोहेर, रॉबिन कोरेरा हे दोघेजण दुचाकीवर दारूची वाहतूक करताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता ती दारू त्यांना ऍम्ब्युलन्समधून मिळाली आहे. त्यांच्याकडे आणखी बॉक्‍स असल्याचे सांगितले.

पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जाऊन संजय गंगाराम हंकारे यास ताब्यात घेऊन ऍम्ब्युलन्सची झडती घेतली. विदेशी कंपनीची एक बॉक्‍स दारू आढळून आली. पोलिसांनी ऍम्ब्युलन्स, दुचाकी, अवैध दारू असा दोन लाख 70 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि वरील तिघांना अटक केली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात वीरू प्रकाश गोहेर, रॉबिन जॉर्ज कोरेरा (दोघे, रा. सिव्हिल कॉर्टर), संजय गंगाराम हंकारे (रा. कृष्णाई बंगला, उदय हौसिंग सोसायटी, रासनेनगर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पांगरमलची सुरवातही इथूनच 
जिल्ह्यात घडलेले पांगरमल दारूकांडही जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील कॅन्टिनमधून सुरू झाले होते. आता पुन्हा जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या ऍम्ब्युलन्समध्ये दारू आढळून आल्याने जिल्हा रुग्णालयाची सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com