Fear and uncertainty loom large in Shaneshwar Devasthan Trust as legal advisors maintain silence on sensitive issues.Sakal
अहिल्यानगर
शनैश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्तांना ‘म्हणणे’ मांडण्याची धाकधुक; सल्लागार वकीलांचे मौन, सल्लागारांची मिठाची गुळणी
No Legal Guidance: विश्वस्त मंडळावर चौकशीचा दुतर्फा फेरा सुरु असल्याने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली असल्याचे दिसते. वरील दोन्ही प्रकरणांमुळे गावाची व देवस्थानची बदनामी झाली असल्याचा सूर परिसरात उमटत आहे. तक्रारदार व्यक्ती अॅप घोटाळ्याची चौकशी होऊन त्यातील सर्वांवर कठोर कारवाई व्हावी.
सोनई :शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये गरज नसताना करण्यात आलेली नोकरभरती, कारभारातील अनियमितता व प्रथमदर्शनी दिसत असलेला भ्रष्टाचार लक्षात घेऊन मुंबई येथील धर्मादाय आयुक्तांनी म्हणणे मांडण्यास दिलेला अवधी दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने विश्वस्त समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी व नऊ विश्वस्तांत धाकधुक वाढली आहे.