esakal | नगरमध्ये आलेले अधिकारी पहिल्यांदा अण्णा हजारे यांची भेट का घेतात
sakal

बोलून बातमी शोधा

Why do the officials who came to the city meet Anna Hazare for the first time

अहमदनगर जिल्ह्यात व पारनेर तालुक्यातही विशिष्ट जागेवर नियक्ती झालेले वरीष्ठ अधिकारी हजर झालेबरोबर लगेचच पहिल्याच आठवड्यात थेट राळेगणसिद्धीची वारी करतात.

नगरमध्ये आलेले अधिकारी पहिल्यांदा अण्णा हजारे यांची भेट का घेतात

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यात व पारनेर तालुक्यातही विशिष्ट जागेवर नियक्ती झालेले वरीष्ठ अधिकारी हजर झालेबरोबर लगेचच पहिल्याच आठवड्यात थेट राळेगणसिद्धीची वारी करतात. तेथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू, असे अभिवचन देतात. अत्तापर्यंत अनेक वर्षापासून अनेक अधिकारी येथे येऊन गेले आहेत. मात्र जिल्ह्यातील जनतेला याचे नेमके कोडे उलगडत नाहीत की हे अधिकारी हजारे यांच्याकडे नेमके कशासाठी जातात. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
हजारे हे खरोखरच आदर्श आहेत त्यांचे मार्गदर्शनही मोलाचे असते. यात कोणतेही दुमत नाही. त्यांची भेट म्हणजे जलसंधारणासह विविध क्षेत्रातील माहिती मिळविण्याचा एक खजिना आहे. मात्र अता ती एक फॅशन झाली आहे. कोणताही वरीष्ठ अधिकारी जिल्ह्यात आला की तो हजार झाल्यावर आठ ते दहा दिवसातच राळेगणसिद्धी ची वारी करतो.

अत्तापर्यंत आलेले बहुतेक सर्वच जिल्हाधिकारी पोलीस अधिक्षक पारनेर तालुक्यातील तहसीलदार पोलिस निरीक्षक आदी मंडळी हजर झाल्यावर लवकरच थेट राळेगणसिद्धी गाठतात आम्ही कसे चांगले आहोत तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत तुमच्या जिल्ह्यात व तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे आम्हाला भाग्य लाभले वैगर सांगून हजारे यांना खूष करतात. 

विविध अधिका-यांच्या राळेगणसिद्धी येथील हजारे यांच्या भेटी म्हणजे फक्त हजारे यांना खूष करण्यासाठी चा कार्यक्रम असतो. अशी चर्चा अता तालुक्यात व जिल्ह्यातही सुरू आहे.

हेही वाचा : कोरोना दरम्यानच हवामानातील बदलांमुळे वाढू लागले इतर आजार
कारण भेटणारा प्रतेक अधिकारी मी कसा चांगला आहे मी कोठे व कसे चांगले काम केले याची माहिती सांगत असतो. व त्यानिमित्ताने हजारे यांच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. मात्र यातील बहुतेक अधिकारी त्या प्रमाणे वागत नाहीत. हजारे हे येथे भेटणा-या प्रतेक अधिका-यास आपल्या कामाची व पंचसुत्रीची माहीती देतात. त्या वेळी ते आवार्जून स्वच्छ चारित्र व निष्कलंक जीवन व जनतेची कामे सेवाभावाने करावित जनसेवा हीच ईश्वर सेवा तसेच भ्रष्टाटारविरहीत कारभार करा असा संदेस देतात मात्र यातील किती अधिकारी या संदेशा प्रमाणे वागतात हा मात्र संशोधनाचा विषय ठरला आहे.

मात्र सध्या तालुक्यात व जिल्ह्यात कोणताही वरीष्ठ अधिकारी आला की तो राळेगणसिद्धीला येणार असे भाकित तालुक्यातील अनेक जाणते लोक अता करू लागले आहेत. त्यामुळे अधिकारी आला की तो राळेगणला येणारच अशी चर्चा सुरू होते. नुकतेच जिल्ह्यात नविन बदलून आलेले जिल्हाधिकारी पोलिस अधिक्षक तसेच पारनेरचे पोलिस निरीक्षकही त्यास अपवाद ठरले नाहीत. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top