कोरोनाबाधित सापडूनही कर्जतचे प्रशासनाचे काम कासवछाप, आमदारांसमोर कामाचा आव

The work of the administration of Karjat is slow
The work of the administration of Karjat is slow

राशीन: मुंबई (वाशी) येथून राशीनला आलेल्या महिलेचा कोरोनाने बळी घेतल्यानंतर आणि त्याची बाधा संबंधित मृत महिलेच्या नातीला आणि लेकाला झाल्यानंतरही कर्जत तालुक्याचे सुस्त झालेले प्रशासन अद्यापि गतिमान होण्यास तयार नाही. सर्व राज्यातील प्रशासनावर आमदार रोहित पवार यांचे एकहाती वर्चस्व आहे. अर्थातच त्यांच्या मतदारसंघातही आहे.

या अगोदर जामखेडही हॉटस्पॉट झाले होते. कर्जत- जामखेड हा रोहित पवार यांचा मतदारसंघ कोरोनाच्या निशाण्यावर आहे.बाहेरील जिल्ह्यातून अथवा रेड झोनमधून आलेल्या लोकांची आकडेवारी प्रशासनाकडे नाही. तसेच आवश्यक ते तपासणी नाके उभारण्यात आलेले दिसत नाहीत.यामुळे पुणे- मुंबईसारख्या रेड झोनमधील मंडळींची घुसखोरी सुरूच आहे.

कालपर्यंत कर्जत तालुक्यात १७५६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. प्रत्येक गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष उभारण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी सांगितले. मात्र या ठिकाणी स्वतंत्र स्वछतागृह नसल्याने विलगीकरण कक्षातील लोकांना एकच स्वछतागृह वापरावे लागते. येथेच कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे.

आज आमदार रोहित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक घेतली.त्यात आपण खूप काम करीत असल्याचा आव आणला जात होता.बैठकीतही कोणत्याही ठोस उपाययोजना दिसल्या नाहीत. ग्रामपंचायतीने अगोदरच घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचण्यात आला. त्यात १४ दिवस गाव बंद ठेवणे, फवारणी करणे, रस्ते सील करणे, सील केलेल्या भागात शिक्षक आणि विस्तार अधिकारी यांच्यामार्फत अत्यावश्यक सेवा पुरवणे आदींचा समावेश होता.

तहसीलदारसाहेब कमालंय तुमची...

तहसीलदार छगन वाघ यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना केल्यात असे विचारले असता अशी माहिती देता येत नाही. यात कोणती गुप्त माहिती आहे तेच जाणो. तहसीलदार वाघ यांनी कधीच बेकायदा धंद्यावर कडक  कारवाई केल्याचे एेकिवात नाही. वाळूतस्करीबाबतही त्यांनी बोटचेपे धोरण घेतलं. शेजारील जामखेड हॉटस्पॉट असताना तेथील तहसीलदार विशाल नाईकवाडी यांनी पायाला भिंगरी लावून काम केले. आता तर तेथे तालुक्यात येणारा प्रत्येकजण जामखेडमध्येच क्वारंटाइन होणार आहे. वाघ यांना आपल्या तालुक्यात किती लोक बाहेरून आले हेही माहिती नाही. मग ते काय उपाययोजना करणार.रोहित पवार यांच्यासारखा खमक्या  लोकप्रतिनिधी असतानाही ते असे वागत आहेत, याचेच लोकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com