
राहुरीतील उमेदवारांसाठी तालुक्यातील एका गावातील इंग्रजी माध्यमाचे खासगी विद्यालय परीक्षा केंद्र होते. मात्र, अपुऱ्या बैठकव्यवस्थेमुळे एकेका बाकावर दोन-दोन उमेदवार बसविले होते.
राहुरी (अहमदनगर) : राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील विविध 54 पदांच्या साडेआठ हजार जागांच्या भरतीसाठी गेल्या रविवारी (ता. 28) लेखी परीक्षा झाली. त्यात राहुरी तालुक्यात एकमेव परीक्षा केंद्र असलेल्या एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात एकेका बाकावर दोन-दोन परीक्षार्थी बसल्याचे समोर आले आहे.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवेवरील वाढता ताण व रिक्त पदे लक्षात घेऊन मंत्रिमंडळाने आरोग्य विभागात रिक्त पदांपैकी 50 टक्के भरतीस मान्यता दिली. त्यानुसार राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा झाली. राहुरीतील उमेदवारांसाठी तालुक्यातील एका गावातील इंग्रजी माध्यमाचे खासगी विद्यालय परीक्षा केंद्र होते. मात्र, अपुऱ्या बैठकव्यवस्थेमुळे एकेका बाकावर दोन-दोन उमेदवार बसविले होते.
एकमेकांची उत्तरे पाहत, रमत-गमत उमेदवारांनी परीक्षा दिली. काही खोल्यांमध्ये परीक्षार्थींचे क्रमांक बाकावर नसल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे या परीक्षेचा पुरता फज्जा उडाला. एका परीक्षार्थीने केंद्रावरील बैठकव्यवस्थेचे छायाचित्रण केल्याने हा प्रकार समोर आला.