दहावी उत्तीर्णांसाठी हनी योजना : तुम्ही फक्त उद्योग उभारा, सरकार उचलेल सर्व जबाबदारी

Honey scheme for 10th pass: You just set up the industry, the government will take all the responsibility
Honey scheme for 10th pass: You just set up the industry, the government will take all the responsibility

नगर : ः राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशीपालन व मधकेंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग यांनी केले आहे.

सुरुंग म्हणाले, की मध उद्योगाचे विनामूल्य प्रशिक्षण व साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान, शासनाच्या हमी भावाने मधखरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाश्‍यांचे संरक्षण व संवर्धनासाठी साह्य देण्यात येते.

योजनेत वैयक्तिक मधपाळ घटकासाठी अर्जदार साक्षर व 18 वर्षे वयावरील असावा. केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ या घटकासाठी व्यक्ती 21 वर्षांपेक्षा अधिक वयाची व दहावी उत्तीर्ण असावी.

व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या नावे किमान दोन एकर शेतजमीन किंवा भाडेतत्त्वावरील शेतजमीन असावी, तसेच मधमाशीपालन प्रजनन व मधउत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण व पायाभूत सुविधा देण्याची क्षमता असावी.

या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः (0241) 2353410, मोबाईल ः 7769935193. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com