अल्पवयीन मुलीला घेऊन पळाला, पोलिसांनी पुरवला पिच्छा

सुनील गर्जे
Thursday, 7 January 2021

पोलिस व पीडितेच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता, रायपूर येथे दोघे आढळून आले.

नेवासे, ता. 6 : अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणास येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 13 वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंड केला. मुक्तार रज्जाक शेख (वय 25, रा. महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासे) असे त्याचे नाव आहे. 

2018मध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलीला आरोपी शेख याने लग्नाच्या आमिषाने पळवून नेले होते. पैठण, जालना, पुणे, रायपूर, छत्तीसगड, पिंपरी खालसा (ता. लोणार), कृष्णपुरी तांडा (ता. चाळीसगाव) आदी ठिकाणी त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले होते.

हेही वाचा - माजी आमदार शिवाजीराव कर्डिलेंना पुतण्याचेच आव्हान

पोलिस व पीडितेच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता, रायपूर येथे दोघे आढळून आले. याबाबत सोनई पोलिसांनी शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या खटल्याची सुनावणी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर झाली.

न्यायालयाने शेख यास 13 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील देवा काळे यांनी काम पाहिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man sentenced to 13 years for kidnapping girl