विदर्भात सर्वाधिक कोरोना बाधित पोलिस या जिल्ह्यात, शहरात आतापर्यंत 11 पोलिसांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

अकोल्यात दिवसागणिक वाढणारा कोरोना बाधितांचा आकडा अनेकांची झोप उडविणारा आहे. यातच कोरोनाने पोलिसांनाही सोडले नसून, आतापर्यंत अकोल्यात ११ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले आहे. विशेष म्हणजे विदर्भातील सर्वाधिक पोलिस कोरोना बाधित अकोल्यातीलच आहेत.

अकोला : अकोल्यात दिवसागणिक वाढणारा कोरोना बाधितांचा आकडा अनेकांची झोप उडविणारा आहे. यातच कोरोनाने पोलिसांनाही सोडले नसून, आतापर्यंत अकोल्यात ११ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले आहे. विशेष म्हणजे विदर्भातील सर्वाधिक पोलिस कोरोना बाधित अकोल्यातीलच आहेत.

शहरात कोरोनाचा प्रकोप वाढतो आहे. सर्वच घटकातील लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे चित्र आजपर्यंतच्या अहवालावरून समोर येते. शहरातील ११ पोलिसांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाल्याने, विदर्भात सर्वाधिक कोरोनाची लागण अकोल्यातील पोलिसांना झाली आहे. सुरुवातीला शहरात रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण निघाला होता.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

हा परिसर रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असल्याने साहजिकच बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी या पोलिसांवर आली. त्यामुळे सुरुवातीला याच पोलिस ठाण्यातील उमरीमध्ये रहिवासी असलेला पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले इतर पोलिसांना कोरोनाची लागण होत गेली.

बुलडाणा जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यानंतर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील एका पोलिस निरीक्षकाला आणि त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. शहरात ११ पोलिसांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असला तरी खंबीरपणे पोलिस या संकटाचा सामना करीत असून, लोकांना संसर्ग होवू नये, म्हणून कर्तव्य बजावत आहेत.

उपाय योजनांची गरज
पोलिसांना सुविधा देवून त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी, यासोबतच कंटेनमेंट झोनमध्ये जे पोलिस कर्तव्यावर आहेत. अशा पोलिसांची कोरोना वॉर्डातील डॉक्टरसारखी ड्युटी संपल्यानंतर घरी गेल्यानंतर कुटुंबियांना संसर्ग होवू नये म्हणून स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करावी. तसेच खबरदारी म्हणून सर्वच पोलिसांच्या टेस्ट करण्याची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In akola district, which has the highest number of corona-infected cases in Vidarbha, 11 corona cases have been reported so far in the city