कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

शहरातील परवानगी असलेल्‍या सर्व व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानांना सम-विषय नियमाप्रमाणे व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठी व्यावसायिकांचे समुपदेशनही करण्यात आले आहे.

अकोला : शहरातील परवानगी असलेल्‍या सर्व व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानांना सम-विषय नियमाप्रमाणे व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठी व्यावसायिकांचे समुपदेशनही करण्यात आले आहे. सोबतच कायद्यात रहाल तर फायद्यात राहाल, इशाराही मनपा आयुक्तांनी व्यावसायिकांना दिला आहे.

 

 

महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता सम-विषम दिनांकाप्रमाणेच दुकाने उघड्यास परवानगी देण्यात आली आहे. सम-विषमचा नियम मोडणाऱ्या दुकानधारकांविरुध्‍द पहिल्‍यांदा आढळून आल्‍यास त्‍यांच्‍यावर पाच हजार रुपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येणार आहे. दुसऱ्यांदा आढळून आल्‍यास शहरामध्‍ये कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत सील करण्‍याची कारवाई दुकानावर करण्‍यात येण्या. येईल, असे आयुक्तांनी दिले.

वर्गीकरणानुसार व्यवसाय सुरू
मनपा हद्दीतील दुकाने (मॉल, मार्केट, कॉम्‍प्‍लेक्‍स) वगळून यांची पी-1, व पी-२ या दोन वर्गात परिशिष्‍ठ नुसार वर्गीकरण करण्‍यात आले आहे. अटी व शर्तीचे आधारे पी-1 या लाइनमधील दुकाने विषम तारखेस उघडी राहणार आहे. त्याच प्रमाणे पी-2 या लाइनमधील दुकाने सम तारखेस सुरू राहतील. सम-विषम प्रमाणे सुरू राहणारी सर्व दुकाने व आस्‍थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्‍यास परवानगी देण्‍यात आलेली आहे.

 

अकोल्याच्या बातम्यासाठी येथे क्लिक करा

यांना नियमातून सुट
शहरातील किराणा दुकान, दूध विक्रेता, दूध डेअरी यांचेसह मेडीकल स्‍टोअर्स, कृषी विषयक साहित्‍याची दुकाने व कृषी सेवा केंद्रे यांनासुध्‍दा सम-विषम दिनांकाची अटमधून सुट देण्‍यात येत आली आहे. त्‍यांनी आपली दुकाने प्रशासनाने दिलेल्‍या वेळेमध्‍ये उघडण्‍यास तसेच परवाना प्राप्‍त असलेले व अन्‍न व औषध प्रशासन यांनी परवानगी दिलेले रेस्‍टॉरंट, खाद्यगृहे यांचे मार्फत घरपोच सेवा देण्‍यासाठी तसेच शहरातील स्‍वीट मार्ट व फरसाण विक्री करणाऱ्या दुकानधारकांनी सम-विषम नियमाचे पालन करून दुकाने उघण्‍याची परवानगी देण्यात आली आहे.

 

हेही वाचा ः तीन महिने कळा सोसून अकोलेकरांना काय घेतला धडा?

किराणा दुकानांसह जीवनावश्यक वस्तूंना सुट
जीवनावश्‍यक वस्‍तू जसे मेडीकल, दूध डेअरी, दूध विक्री, कृषी विषयक दुकाने, कृषक केंद्रे, किरणा दुकाने वगळून इतर सर्व व्‍यावसायिक प्रतिष्‍ठाने प्रशासनाने ठरवून दिलेल्‍या सम-विषम दिनांक व वेळेतच उघडावी. अन्‍यथा नियमाचे उल्‍लंघन करणाऱ्या व्‍यावसायिकांविरुध्‍द मनपा प्रशासनाव्‍दारे कारवाई करण्‍यात येईल.
- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you abide by the law, you will benefit! Akola city news