अकोला : दिवसाला १२ कोटी वसुलीचे लक्ष्‍य!

मालमत्ता कर : ५० टक्के सुट मिळविण्यासाठी उरले ११ दिवस
12 crore recovery target Property tax Shasti Abhay Yojana akola
12 crore recovery target Property tax Shasti Abhay Yojana akolasakal

अकोला : महानगरपालिकेच्या थकीत कर वसुलीला चालना देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मार्च व एप्रिलमध्ये शास्ती अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत गत दोन वर्षांतील थकीत मालमत्ता कराचा भरणा ता. ३१ मार्चपर्यंत करणाऱ्यांना शास्तीच्या रकमे (व्याजाच्या) ५० टक्के मिळविण्यासाठी ११ दिवस शिल्लक राहिले आहेत. दुसरीकडे मनपाच्या मालमत्ता कर विभागाला आर्थिक वर्षाअखेरीस वसुलीचे १०० टक्के लक्ष्‍य गाठण्यासाठी सोमवारपासून दिवसाला १२ कोटी रुपये वसुली करावी लागणार आहे.

महानगरपालिका हद्दीत सन २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षात (कोविड-१९) कोरोना या विषाणूचा प्रादुर्भावामुळे सर्वसामान्‍य नागरिक, उद्योजक, व्‍यावसायिक यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्‍यामुळे बऱ्याच मालमत्‍ताधारकांना मालमत्‍ता कराचा वेळेवर भरणा करता आला नाही. त्यामुळे ता. ३१ मार्चपर्यंत जे मालमत्‍ताधारक थकित व चालू संपूर्ण मालमत्‍ता कराचा भरणा एक रकमी करतील त्‍यांना शास्‍ती कराच्‍या रकमेत ५० टक्‍के सुट देण्‍यात येणार आहे. याशिवाय ता. १ ते ३० एप्रिल या कालावधित जे मालमत्‍ताधारक संपूर्ण कराचा एकर कमी भरणा करतील त्‍यांना शास्‍तीच्‍या रक्‍कमेत २५ टक्‍के सुट देण्‍यात येईल. ही योजना लागू केल्याने यावर्षी मालमत्ता कर वसुलीचा आकडा प्रथमच ७५ कोटीच्या वर गेला आहे. यापूर्वी कधीही मालमत्ता कर वर्षाला ५० कोटीच्या वर वसुल झाला नाही. यावर्षी थकीत व चालू वर्षाचा मिळून एकूण २०४ कोटी ३१ लाख रुपये वसुलीचे लक्ष्‍य होते. त्यापैकी ७५ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. आता उर्वरित ११ दिवसांमध्ये वसुलीचे लक्ष्‍य १०० टक्के गाठण्यासाठी दिवसाला १२ कोटी रुपये वसुली करावी लागणार आहे. त्यामुळे यावर्षीय १०० टक्के मालमत्ता कर वसुली होणे अश्यक आहे.

१२७ कोटी जुनी वसुली शिल्लक

अकोला मनपा हद्दीतील मालमत्ता कराचे १२७.६४ कोटी रुपये थकीत आहे. याशिवाय विद्यमान आर्थिक वर्षातील ७६.६६ कोटी रुपये आहे. असे एकूण २०४.३१ कोटी रुपये वर्षभरात वसुली करण्याचे लक्ष्य होते. त्यापैकी आतापर्यंत जुने वसुली व चालू आर्थिक वर्षांतील मिळून एकूण ७५ कोटीपेक्षा अधिक मालमत्ता कर वसूल झाला आहे. ही मनपाच्या इतिहासातील एका वर्षातील सर्वांधिक वसुली ठरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com