1720 employee reach at 385 voting booth from 249 vehicle murtizapur lok sabha election 2024
1720 employee reach at 385 voting booth from 249 vehicle murtizapur lok sabha election 2024Sakal

Lok Sabha Poll 2024 : १७२० कर्मचारी २४९ वाहनांमधून ३८५ मतदान केंद्रांवर पोचले

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात आज लोकसभेसाठी मतदान; दोन लाख ९८ हजार १७८ मतदार

मूर्तिजापूर : लोकसभेच्या अकोला मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील एक हजार ७२० कर्मचारी आज २४९ वाहनांमधून ३८५ मतदान केंद्रांवर पोचले असून, उद्या (ता. २६) सकाळी सात ते संध्याकाळी सहा दरम्यान एक लाख ५४ हजार ४७४ पुरुष, एक लाख ४३ हजार ६९८ महिला व सहा तृतीय पंथी, असे एकूण दोन लाख ९८ हजार१७८ मतदार शुक्रवारी (ता.२६) मतदानाचा हक्क बजावतील.

मूर्तिजापूर विधानसभा मतदर संघात या निवडणुकीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या कल्पक नियोजनात प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मूर्तिजापूर उपविभागात मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुका तसेच अकोला तालुक्यातील काही गावे मिळून विधानसभा संघातील ३८५ मतदान केंद्रांवर सुमारे एक हजार ७३० मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी व मतदान अधिकारी अशी शासकीय,

निम शासकीय व खासगी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. निवडणुकीच्या इतर कामाकरिता ३८० कर्मचारी व पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मतदान केंद्रावर विविध कामासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते मतमोजणीसाठीच्या कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विविध विभागातील सरकारी, निमसरकारी तसेच खासगी आस्थापनेवरील स्त्री, पुरुष कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणुकीच्या कामासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत व त्यांना प्रत्येक बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सर्व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना आज सकाळी आठ वाजेपासून शासकीय गोदाम परिसरातील विविध स्टॉल्सवरून मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. सकाळी दहा वाजता त्यांना आपापल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले. सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, रॅम्प, अपंग मतदारांसाठी व्हीलचेअर उपलब्ध ठेवण्यात आलेली आहे. वाढत्या उष्णतेपासून संरक्षण करण्याकरिता आवश्यक तेथे शामियाना लावण्यात आला आहे.

पथकाला साहित्याचे वाटप

निवडणूक निरीक्षक रामप्रतापसिंग जादोन यांच्या उपस्थितीत सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी स्वतः ध्वनिक्षेपकाचा ताबा घेत विविध सूचना देऊन मतदान पथकांना मतदन साहित्याचे वाटप करवून घेतले. तहसीलदार शिल्पा बोबडे, राज वजीरे, नायब तहसीलदार उमेश बनसोड व रवी राऊत, सर्व महसूल कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी त्यांना सहकार्य केले.

असे आहेत मतदार संघातील मतदार

  • मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघात संपूर्ण मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुका तसेच अकोला तालुक्यातील कुरणखेड मंडळ व बोरगाव मंजू मंडळातील काही गावांचा समावेश आहे.

  • मूर्तिजापूर तालुक्यात १९४, बार्शीटाकळी तालुक्यात १५४ व अकोला तालुक्यात ३७, असे एकूण ३८५ मतदान केंद्र आहेत.

  • या ३८५ मतदान केंद्रांवर एक लाख ५४ हजार ४७४ पुरुष, एक लाख ४३ हजार ६९८ महिला व सहा तृतीय पंथी, असे एकूण दोन लाख ९८ हजार १७८ मतदार शुक्रवारी (ता.२६) मतदानाचा हक्क बजावतील.

मतदान पथके सर्व मतदान केंद्रांवर मतदन साहित्यसह पोचली आहेत. त्यांच्या अडचणीकडे कटाक्ष असेल. मतदरांनी शुक्रवारी (ता.२६) आपला मतदनाचा हक्क बजावणे आवश्यक आहे.

- संदीपकुमार अपार, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com