esakal | धोक्याची घंटा; अकोला जिल्ह्यात ‘सारी’चे २० बळी!
sakal

बोलून बातमी शोधा

धोक्याची घंटा; अकोला जिल्ह्यात ‘सारी’चे २० बळी!

धोक्याची घंटा; अकोला जिल्ह्यात ‘सारी’चे २० बळी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना विषाणूचा धोका वाढत असताच जिल्ह्यात आतापर्यंत सारी या रोगाने ग्रस्त २० जणांचा बळी गेल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनासह आता सारीपासून सुद्धा स्वतःचा बचाव करणे आवश्यक झाले आहे. (20 victims of sari in Akola district!)

हेही वाचा: खेड्यापाड्यात काम करणाऱ्या युवकाला मिळाली लंडनमध्ये स्कॉलरशिप

कोरोना हा आजार साधारण २०२० च्या सुरुवातीला किंवा सन २०१९ च्या अखेरीस झाल्याचे सांगितल्या जाते. या आजाराने अवघ्या देशात दीड वर्षांपासून धूमाकुळ घातला आहे. राज्यात व जिल्ह्यात सुद्धा कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यासोबतच कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही मोठा आहे. असे असले तरी सारी हा आजार जुनाच आहे. या आधीही सारी आजारामुळे अनेकांचे प्राण घेतले आहेत.

हेही वाचा: दोन गटातील एकूण सहा गंभीर जखमी, दोन ट्रॅक्टर नदीत फेकले

सारी आणि कोरोना या दोन्ही आजारांची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. दोन्ही आजारांमध्ये सुरुवातीला सर्दी, खोकला असा साधारण त्रास होतो. नंतर हाच त्रास वाढत पुढे न्युमोनिया आजारात परावर्तीत होतो. ज्यामुळे फुफ्फुसात संसर्ग होतो. त्यामुळे रुग्णाला श्वसनाचा त्रास जाणवतो. श्वसनास त्रास झाल्याने रुग्ण पुरेशा प्रमाणात श्वास घेऊ शकत नाही. परिणामी शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. ही पातळी अधिक मोठ्या प्रमाणावर घटली असता रुग्णाचा मृत्यू देखील होतो. या जीवघेण्या आजाराचे जिल्ह्यात गत काही दिवसांपासून रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबत या रोगाने ग्रस्त २० जणांचा आतापर्यंत मृत्यू सुद्धा झाला आहे. ही बाब सर्वांसाठी चिंतेची आहे.

हेही वाचा: जिल्हा परिषदेच्या राजकारणात विधानसभेची मोर्चेबांधणी


सारी आजाराची लक्षणे
- श्वसन विकार
- न्युमोनिया
- टीबीची लक्षणं
- फुफ्फुसाला इंफेक्शन
- शरीराती ऑक्सिजन पातळीत घट


परिमंडळात ६१ जणांचा मृत्यू
सारी या आजारमुळे जिल्ह्यातील २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यासोबत अमरावती जिल्ह्यात १२, बुलढाणा जिल्ह्यात १३, वाशीममध्ये १ तर यवतमाळ जिल्ह्यात १५ अशा एकूण ६१ रुग्णांचा सारीमुळे मृत्यू झाला आहे.

संपादन - विवेक मेतकर

20 victims of sari in Akola district!

loading image