अकाेला : महसूल वसुलीत अकोला जिल्हा विभागात प्रथम!

१०१ कोटी ५३ लाख ३१ हजार रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत
 अकोला महसूल वसुली
अकोला महसूल वसुलीsakal

अकाेला : जिल्हा प्रशासनाने मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात १०६.३४ टक्के महसुली उत्पन्न गाठून १०१ कोटी ५३ लाख ३१ हजार रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या ९५ काेटी ४८ लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी वसुली अधिक असल्याने महसूलाच्या वसुलीत जिल्ह्याने अमरावती विभागातील इतर जिल्ह्यांना मागे टाकत प्रथम स्थान मिळवले आहे. विभागातील वाशीम, बुलढाणा व यवतमाळ जिल्ह्यांनी उद्दिष्ट गाठले असले तरी अकोला जिल्ह्याने उद्दिष्टाच्या पलिकडे झेप घेतली आहे. त्यामुळे ही बाब जिल्हा प्रशासन व जिल्ह्यासाठी कौतुकास्पद आहे.

राज्य शासनाकडून दरवर्षी जिल्हा प्रशासनास शेतजमिनीचा सारा, अकृषक सारा वसुली, औद्योगिक क्षेत्रातील कुळ कायदा कलमानुसार वसुली, गौण खनिजाची वसुली, गौण खनिजाची अनधिकृतरित्या केलेली वाहतूक व त्यामुळे केलेल्या दंडात्मक कारवाईची वसुलीसाठी उद्दीष्ट देण्यात येते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाला ‘अ’ प्रपत्राच्या वसुलीपासून (शेतसारा, बिगरशेती, औद्योगिक वापर) २३ कोटी ९३ लाख ३७ हजार रुपयांचा, गाैण खनिजाच्या वसुलीपासून ७७ कोटी ५८ लाख ७१ हजार रुपयांचा असा एकूण १०१ कोटी ५३ लाख ३१ हजार रुपयांचा महसूल मिळाला.

जिल्हा प्रशासनाला २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ९५ कोटी ४८ लाख रुपयांच्या वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले हाेते. परंतु जिल्हा प्रशासनाने दिलेले उद्दीष्ट ओलांडत १०१ काेटी ५३ लाख रुपयांची वसुली केल्याने जिल्हा विभागात प्रथम क्रमांकावर आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी जिल्हा प्रशासनाला ९५ काेटी ४८ लाख रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दीष्ट दिले हाेते. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील चार महसुली उपविभागाअंतर्गत येणाऱ्या अकाेला, अकाेट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी तालुक्यातील तहसीलदार व प्रत्येक उपविभागातील उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाईचा धडका लावला.

असे आहेत जिल्हानिहाय आकडे

  • अमरावती जिल्ह्याला १५१ कोटी १८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १०२ ककोटी ८५ लाख १ हजार रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. त्याची टक्केवारी ६८.३ आहे.

  • अकोला जिल्ह्याला ९५ कोटी ४८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी जिल्ह्याने १०१ कोटी ५३ लाख ३१ हजार रुपयांची वसुली केली. त्याची टक्केवारी १०६.३४ आहे.

  • यवतमाळ जिल्ह्याला १४० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १४२ कोटी १३ लाख १० हजार रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. त्याची टक्केवारी १००.९६ आहे.

  • बुलढाणा जिल्ह्याला १२० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १२१ कोटी ५८ लाख २३ हजार रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. त्याची टक्केवारी १००.६६ आहे.

  • वाशीम जिल्ह्याला ५७ कोटी ४५ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ५७ कोटी ५४ लाख ८५ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. त्याची टक्केवारी १००.१७ आहे.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या पाठपुराव्यामुळे व सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व खनिकर्म अधिकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीमुळे जिल्ह्याने महसूल वसुलीत उद्दिष्टापलीकडे झेप घेतली आहे. त्यामध्ये ग्राऊंड लेव्हलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसुद्धा मोठा वाटा आहे.

- गजानन सुरंजे, उपजिल्हाधिकारी (महसूल), अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com