अकाेला : दोन हजार ७५४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

voting

अकाेला : दोन हजार ७५४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकाेला : अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत दोन हजार ७५४ मतदार मतदानाचा हक्क बाजवणार आहेत. अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. मतदार यादी जाहीर झाल्याने निवडणुकीत संचालकपदासाठी इच्छुकांनी आता मतदारांना आकृष्ट करण्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची यापूर्वी सन २०१५ मध्ये निवडणूक झाली हाेती. त्यानंतर मार्च २०२० मध्ये निवडणूक हाेणे अपेक्षित हाेते. काेराेना संसर्गामुळे लांबणीवर पडलेली निवडणूक कार्यक्रम मतदार यादी तयार करण्यापासून सुरू झाला आहे. अंतिम यादी १६ नाेव्हेंबर राेजी प्रकाशित करण्यात आली. यापूर्वी प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावर ता. ३ नोव्हेंबरपर्यंत हरकती आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानुसार निवृत्त झालेले सभासद व थकबाकीदारांच्या नावावर आक्षेप घेण्यात आले होते. त्यानंतरही ४६६ नवीन मतदारांची भर पडली आहे. विविध संघटनांच्या इच्छुक संचालक उमेदवारांचे या नवीन मतदारांवर विशेष लक्ष राहणार आहे.

तेरा जागांसाठी होणार मतदान

पतसंस्थेत संचालकांच्या १३ जागा आहेत. सध्या दाेन जागा रिक्त आहेत. एका संचालकाचा मृत्यू झाला असून, दुसरी जागा निवृत्तीमुळे रिक्त आहे. विद्यमान संचालकांमध्ये चार संचालक शिक्षक समितीचे तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, कास्ट्राईब, बहुजन शिक्षक संघटना, स्वाभिमानी शिक्षक संघटना, शिक्षक आघाडी, साने गुरुजी शिक्षक संघ, उर्दू शिक्षक संघटनेच्या प्रत्येकी एका संचालकाचा समावेश आहे. एक संचालक स्वीकृत आहे.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

पतसंस्थेची तालुकानिहाय मतदारसंख्या

तालुका मतदार ठेवीदार मतदार एकूण

अकाेला ४१४ ८७ ५०१

अकाेट ३९३ १२० ५१३

बार्शीटाकळी २९१ ३६ ३२७

पातूर २८० ४७ ३२७

तेल्हारा ३२१ ९३ ४१४

एकूण २३०३ ४५१ २७५४

loading image
go to top