Akola : शहरासाठी ९२१ कोटीची वाढीव पाणीपुरवठा योजना

उपमुख्यमंत्र्यांची अकोल्यात घोषणा; जीगावमधून ३२ दलघमी पाणीही आरक्षित
akola
akola sakal

अकोला - पालकमंत्रीपद गेले तरी पालकत्व सोडले नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला शहरासाठी ९२१ कोटी रुपायंची वाढीव पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली. त्यासाठी जीगाव प्रकल्पातून ३२ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले असून, १६७४ कोटीचा मल्यनित्सारण प्रकल्पही मंजूर करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. या कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीष पिंपळे, आमदार अमोल मिटकरी,

माजी आमदार बळीराम सिरस्कार, जि.प. अध्यक्ष संगीत अढाऊ, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये, आरोग्य उपसंचालक तरंगतुषार वारे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि.प. सीईओ वैष्णवी बी, जिल्हा आरोग्य अधिकारी, माजी महापौर विजय अग्रवाल, अनुप धोत्रे, अर्चना मसने, जयंता मसने, किशोर मांगटे पाटील, सागर शेगोकार, ॲड. देवाशीस काकड, आदींची उपस्थिती होती.

Satara Politics : दादांची 'दादागिरी' साताऱ्यात चालेल का ? पालकमंत्री पदावरून जोरदार चर्चा ...

उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा

अकोला शहरासाठी ९२१ कोटीची वाढीव पाणीपुरवठा योजना

जीगाव प्रकल्पातून ३२ दलघमीपाणी आरक्षण

१६७४ कोटीचा मलनित्सारण प्रकल्प

पंतप्रधान ई-सेवा प्रकल्पातून इलेक्ट्रिक बस (शहर वाहतूक)

१६४ कोटी निधीतून २०० किलोमीटरचे ग्राम सडक योजनेतून रस्ते

सिंचन प्रकल्पांसाठी निधी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सहा हजार कोटीचा निधी

akola
Akola News : अकोला जिल्ह्यातील २८ शहिदांच्या शौर्यातून मिळणार प्रेरणा

राजराजेश्वराला पर्यटनाचा दर्जा

अकोला शहराचे ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराला पर्यटनाचा दर्जा देवून या परिसरात विकासाची कामे करण्यात येणार असल्याची घोषणा उमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. त्यांनी याची जबाबदारी नवनियुक्त पालकमंत्री विखे पाटील यांच्यावर सोपविली आहे.

सर्व सामान्यांना परवडणारी आरोग्य सेव हवी- पालकमंत्री

अकोला शहर हे आरोग्य सेवेच्या बाबतीत हब होते आहे, ही चांगली बाब आहे. हे काम होत असताना आरोग्य सेवा सर्व सामान्यांना परवडणारी असावी, असा सल्ला अकोला जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

akola
Solapur : आरक्षणासाठी आत्महत्या करू नका; पोरचं मेली तर आरक्षण घेवून करायचं काय - मनोज जरांगे पाटील

शिबिरात एकही रुग्ण येणार नाही ते खरे यश- आमदार सावरकर

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना एकाच ठिकाणी सर्व आरोग्य सुविधा पुरविले जात आहे. शिबिरात झालेली गर्दी हे यश नाही. आरोग्य सुविधा या निरंतर मिळत राहणे आवश्यक आहे. ज्या दिवशी शिबिरात एकाही रुग्ण येणार नाही, ते खरे यश असेल, असे आमदार रणधीर सावरकर म्हणाले.

गजानन महाराज संस्थांकडून भोजनाची व्यवस्था

अकोला येथे आयोजित महाआरोग्य शिबिरात येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी भोजनाची व्यवस्था श्री संत गजाजन महाराज संस्थान शेगावच्या वतीने करण्यात आली होती. एक सेवा भाव म्हणून रुग्णांसाठी भोजनाची व्यवस्था करणाऱ्या संस्थेचे आमदार रणधीर सावरकर यांनी आभार मानले.

आरोग्य सेवेसाठी निधी

अकोला येथील रुग्णालयात वॉर्डसाठी ६५ कोटी व बाह्य रूग्ण विभागाासाठी ८५ कोटी असा एकूण १७० कोटीचा निधी देण्यात आला. त्याचप्रमाणे, रुग्णालयांच्या दीर्घकालीन विकासासाठी ९५० कोटी निधीचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे दाखल करण्यात येत आहेत. अतिविशेषोचार रूग्णालयासाठी केंद्र शासनाने १२० कोटी व राज्य शासनाने ४० कोटीचा निधी दिला. प्रधानमंत्री जनविकास योजनेतून ४६ कोटी निधीतून १०० खाटांचे शिवापूर येथे उपजिल्हा रूग्णालय, तसेच बोरगाव मंजू येथे ग्रामीण रूग्णालय निर्माण होणार आहे. सर्वोपचार रूग्णालयालाही निधी मिळवून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com