बुलडाणा : हातभट्टी दारूवर उत्पादन शुल्क विभागाचे धाड सत्र

एकूण ७३ वारस गुन्हे नोंदवून एकूण ७५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
crime
crimesakal

बुलडाणा : उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांच्या आदेशानुसार हातभट्टीच्या दारूचे उत्पादन, वाहतूक व विक्री या विरुद्ध धाड सत्र सुरू केली असून, मोहीम ८ ऑक्टोंबर पर्यंत चालणारआहे. गेल्या १५ दिवसात ८४ गुन्हे नोंदविले. त्यात एकूण ७३ वारस गुन्हे नोंदवून एकूण ७५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

विभागाने ११ बेवारस गुन्हे नोंदविले आहे. या कारवाईत ९४७ लिटर हातभट्टी दारू,१७ हजार ४२९ लिटर रसायन, ३०६.५९ लिटर देशी दारू व ६.८४ लिटर विदेशी दारू तसेच २५ लिटर ताडी जप्त केली आहे. या मोहिमेमध्ये अवैध मद्य वाहतूक अथवा विक्री करणारे एकूण ९ वाहने जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी ८ दुचाकी व १ तिन चाकी वाहन आहे. जप्त वाहनांची एकूण किंमत ४,५१,००० रुपये आहे. तसेच वाहनाखेरीज इतर जप्त मुद्देमालाची किंमत ५,६१,३८० रुपये इतकी असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १० लक्ष १२ हजार ३८० रुपये इतकी आहे.

crime
बेळगाव : चिक्कोडीत दोन ठिकाणी घरफोडी

मोहिमेत ८ सप्टेंबरला बिबी येथे मेहकरचे दुय्यम निरीक्षक एस. डी. चव्हाण यांनी १ वारस गुन्हा नोंदवून ४७ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात ४५ हजार रुपये किमतीची १ दुचाकी आहे. तसेच ११ सप्टेंबर रोजी मलकापूर तालुक्यातील झोडगा शिवारात दुय्यम निरीक्षक अमित अडळकर यांनी १ वार गुन्हा नोंदवून ३७ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात ३६ हजार रुपये किमतीच्या दुचाकीचा समावेश आहे. १२ सप्टेंबरला पिंपळगाव काळे ता. जळगाव जामोद शिवारात शेगावचे दुय्यम निरीक्षक एन. के मावळे यांनी १ वारस गुन्हा नोंदवीत ७० हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ६५ हजार रुपये किमतीची एक दुचाकी आहे.

१७ सप्टेंबरला गव्हाण फाटा ता. खामगाव येथे दुय्यम निरीक्षक आर. के फुसे यांनी १ वारस गुन्हा नोंदविला आहे. याठिकाणी ७१ हजार ५४० रुपये किमतीचा मुद्देमालामध्ये ६० हजार रुपये किमतीची दुचाकीही जप्त केली आहे. मलकापूर तालुक्यातील हरसोडा जुने येथे २२ सप्टेंबर रोजी दुय्यम निरीक्षक अमित अडळकर यांनी १ वारस गुन्हा नोंदवीत ७० हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ६५ हजार रुपये किमतीची दुचाकी आहे.

त्याचप्रमाणे ६ सप्टेंबर रोजी प्र. निरीक्षक, भरारी पथक आर. आर उरकुडे यांनी एक दुचाकी, २२ सप्टेंबर रोजी १ दुचाकी व १ तीन चाकी वाहन जप्त केले आहे. त्याची किंमत १ लक्ष ६ हजार ८६० रुपये आहे. मोहिमेत अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक जी. आर गावंडे, दुय्यम निरीक्षक एन. के मावळे, आर. के फुसे, अमित अडळकर, रविराज सोनुने, एस. डी चव्हाण, आर.आर उरकुडे, वा.रा बरडे, पी.व्ही मुंगडे व सर्व जवान, जवान नि वाहनचालक यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com