
फटाके फोडणाऱ्या बुलेटविरुद्धची मोहीम आणखी कडक करण्यात आली आहे. यापुढे गाडीच्या सायलन्सरमध्ये फटका फुटला तर थेट बुलेट जप्तीची मोहीम राबविणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिली.
अकोला : फटाके फोडणाऱ्या बुलेटविरुद्धची मोहीम आणखी कडक करण्यात आली आहे. यापुढे गाडीच्या सायलन्सरमध्ये फटका फुटला तर थेट बुलेट जप्तीची मोहीम राबविणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून शहर वाहतूक शाखा अकोलातर्फे शहरातील फटाके फोडणाऱ्या बुलेटविरुद्ध धडक मोहीम राबवित आहे.
हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री
त्या अंतर्गत बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून फटाके फोडणारे सायलेन्सर लावून बुलेट चालविणाऱ्या ‘बुलेट राजां’च्या उनाडखोरीला चाप लावला जात आहे. बुलेटविरुद्ध धडक मोहीम राबवून आतापर्यंत २५ बुलेट वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्यात.
त्यांचेवर दंडात्मक कारवाई करून अशा बुलेटचे सायलेन्सर बदलून घेऊन परत मूळ सायलेन्सर लावून मगच बुलेट सोडण्यात आल्यात. या मोहिमेचा काही अंशी फरक पडला; परंतु शहरात अजूनही बरेच तरुण एक क्रेझ म्हणून अशा फटाके फोडणाऱ्या बुलेट सुसाट वेगाने चालवित असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
हेही वाचा -चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच
या तक्रारीची दखल घेऊन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे निर्देशाप्रमाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी सायलेन्सर बदलून फटाके फोडणाऱ्या बुलेट विरुद्धची मोहीम आणखी कडक केली आहे.
हेही वाचा -आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’
अशा बुलेट आढळून आल्यास त्यांचेवर सरळ जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यांचा अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाठवून त्यांची कारवाई झाल्या नंतरच त्यांचे निर्देशानंतरच अशा बुलेट सोडण्यात येणार आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)