
मेहकर मतदार संघाचे शिवसेना आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर यांच्या इनोव्हा गाडीचा 9 जानेवारीला रात्री 12 वाजेदरम्यान जालना येथे अपघात झाला. यामध्ये मुलासह पाच व्यक्ती किरकोळ जखमी झाले.
\घाटबोरी (जि.बुलडाणा) : मेहकर मतदार संघाचे शिवसेना आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर यांच्या इनोव्हा गाडीचा 9 जानेवारीला रात्री 12 वाजेदरम्यान जालना येथे अपघात झाला. यामध्ये मुलासह पाच व्यक्ती किरकोळ जखमी झाले.
शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचा मुलगा नीरज संजय रायमुलकर व त्याचे मित्र 9 जानेवारीला संभाजीनगरला गेले होते.
परत येताना जालना शहरातील कन्हैयानगर ते बीड बायपास रस्त्यावर गाडी क्रमांक एमएच 28 बीके 2777 चे टायर फुटून तिने रस्त्याच्या खाली 3 ते 4 पलटी घेत सरळ झाली.
हेही वाचा - पुन्हा बलात्काराने हादरला महाराष्ट्र, 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्येच केला बलात्कार
या अपघातात नीरज संजय रायमुलकर, वरद ठाकूर, ऋषी पागोरे, प्रतीक इंगळे व सुनील पंडारे किरकोळ जखमी झाले. नीरज रायमुलकर हे स्वतः वाहन चालवत होते.सुदैवाने आ.संजय रायमुलकर हे मेहकर येथे होते.
हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच
तर एक वर्षापूर्वी याच तारखेला मेहकर ते जानेफळ रस्त्यावर आमदार संजय रायमुलकर यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यात आमदार संजय रायमुलकर यांना दुखापत झाली होती.
(संपादन - विवेक मेतकर)