esakal | दरवाढीचा विरोध करताय तर कांदा बियाणे दराबाबतही थोडं बोला आता!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Buldana News: Shout for onion price hike, silence on seed price!

कांद्याचे भाव थोडे जरा वाढले तरी संपूर्ण देशात ओरड सुरू होते. सध्या कांद्याला प्रती क्विंटल चार हजार रुपये भाव झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खुशीचे वातावरण असताना कांदा खाणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहे. हे वास्तव असले तरी हाच कांदा पिकविणारा शेतकरी सध्या ४ लाख रुपये क्विंटलचे बियाणे खरेदी करून कांदा लागवड करीत असताना बियाणे दर वाढविणाच्या विरोधात कुणीही ओरड करताना दिसत नाही.

दरवाढीचा विरोध करताय तर कांदा बियाणे दराबाबतही थोडं बोला आता!

sakal_logo
By
विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (जि.बुलडाणा)  ः कांद्याचे भाव थोडे जरा वाढले तरी संपूर्ण देशात ओरड सुरू होते. सध्या कांद्याला प्रती क्विंटल चार हजार रुपये भाव झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खुशीचे वातावरण असताना कांदा खाणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहे. हे वास्तव असले तरी हाच कांदा पिकविणारा शेतकरी सध्या ४ लाख रुपये क्विंटलचे बियाणे खरेदी करून कांदा लागवड करीत असताना बियाणे दर वाढविणाच्या विरोधात कुणीही ओरड करताना दिसत नाही.


गेल्या दोन वर्षांपासून सततची अतिवृष्टी व अधूनमधून वादळी वाऱ्याचे आगमन होत असल्याने एकतर वाफा पद्धतीने जगविलेले रोपटे खराब होत आहेत. सोबतच कांदा बियाण्यालाही दरवर्षी गारपीटीने त्रस्त करत शेतकऱ्यांसाठी वाईट दिवस आणून ठेवले आहे.

या ना अनेक कारणाने कांदा उत्पादक शेतकरी अधिकच अडचणीत सापडला असताना थोडे जरी कांद्याच्या भावात वाढ झाली म्हणजे सामान्यापासून सर्वांच्याच डोळ्यात अश्रू येतात. त्याबाबत ओरड करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्याप्रती रोष व्यक्त केला जातो,

परंतु हाच शेतकरी रोजच्या जेवणातील कांद्याला जिवंत ठेवण्यासाठी आजरोजी कोणत्या तरी शेतकऱ्याजवळूनच ४ लाख रुपये क्विंटलने बियाणे आपल्या शेतात ओतून आपली गरज भागविण्यासाठी संघर्ष करीत आहे.

महागाईच्या काळात डिझेल, पेट्रोल व इतर सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे महागाई भत्त्यातही दरवर्षी वाढ होत असताना शेतीत पिकणाऱ्या पिकांचे भाव नाममात्र वाढत असताना उत्पादत खर्च कितीतरी पटीत वाढत चालल्याने शेती व्यवसाय हा तोट्याचा ठरत आहे.


महागडे बियाणे टाकूनही निसर्ग साथ देईल का?
सद्या खरीप हंगामातील उडीद, मूग, हरभरा,सोयाबीन आदी पिके काढली गेल्याने या शेतात कांदा बियाणे (टोळ)लागवडीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. त्यासाठी चार हजार रुपये क्विंटलचे कांदे खरेदी केले जात आहेत. एकरी १० ते १२ क्विंटल कांदे यासाठी लागत असून, ४० ते ५० हजार रुपये नुसते कांद्याचे होणार आहे. आगामी अवकाळी व गारपीट हे पीक किती येऊ देणार व भाव काय ठरणार यावर शेतकऱ्यांचे भवितव्य ठरणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर, अकोला)