Nima Arora
Nima Arorasakal

अकोला : जिल्हाधिकारी अरोरा कोरोना पॉझिटिव्ह

१२३ नवे रुग्ण आढळले
Published on

अकोला : जिल्हाधिकारी निमा अरोरा (Nima Arora)यांना कोरोनाची(Corona) बाधा झाली आहे. त्याची तब्बेत स्थिर असून त्या गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. याव्यतिरिक्त जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) १२३ नव्या कोरोना बाधितांची भर पडली. त्यासोबतच ५८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाचे १ हजार ५९७ रुग्‍ण उपचार घेत आहेत.

Nima Arora
कोविड बळींच्या वारसांचे ९५० अर्ज मंजूर

जिल्ह्यात सर्वत्र कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची तब्बेत ठिक नसल्याने त्यांची १४ जानेवारीरोजी आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निमा अरोरा यांना कोरोनाची बाधा झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे जिल्हाधिकारी अरोरा या १४ जानेवारीपासून अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या नाहीत. त्याना कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्या गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. त्याच्या कार्यालयातील इतरांची वैद्यकीय तपासणी केली असता ते निगेटिव्ह आले.

Nima Arora
अकोला : कंत्राटी नोकरीसाठी बेरोजगारांची गर्दी!

५८ जणांना डिस्चार्ज

कोरोना संसर्ग तपासणीचे सोमवारी (ता. १७) जिल्ह्यात ३०१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २०२ अहवाल निगेटिव्ह तर ९९ अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी लॅबमध्ये १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर रॅपिडच्या चाचणीत सुद्धा ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये सोमवारी जिल्ह्यात एकूण १२३ नव्या रुग्णांची भर पडली. याव्यतिरिक्त ५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाचे १ हजार ५९७ रुग्ण उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com