Akola News : कंत्राटी नोकरीसाठी बेरोजगारांची गर्दी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola
अकोला : कंत्राटी नोकरीसाठी बेरोजगारांची गर्दी!

अकोला : कंत्राटी नोकरीसाठी बेरोजगारांची गर्दी!

अकोला : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा(third wave of corona) धोका लक्षात घेता जिल्हा शक्य चिकित्सक कार्यालयामार्फत आरोग्य विभागात कंत्राटी पदावर बेरोजगारांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोमवार (ता. १७) असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय परिसरातील जिल्हा शल्सचिकित्सक (CS) कार्यालयात बेरोजगारांची अर्ज देण्यासाठी तोबा गर्दी झाली. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत असतानाच या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. (Recruitment of unemployed on contract basis in akola)

हेही वाचा: स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी होणार आज मतदान

विदेशात कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट धुमाकूळ घालत असून अनेक देशांमध्ये कोरोनाचा विस्फोट होत आहे. देशात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. राज्याची राजधानी मुंबई व पुणे येथे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. इतर जिल्ह्यात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या वाढत असून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

त्याअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत कंत्राटी तत्वावर तीन महिने किंवा कोविड असेपर्यंत १२ विविध पदांच्या कंत्राटी नोकरीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. सदर पदांसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस १७ जानेवारी असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या बेरोजगारांनी अर्ज भरण्यासह तो दाखल करण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यालयात सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे दिसून आले.

हेही वाचा: १८ वर्षांच्या संसारानंतर रजनीकांत यांच्या मुलीचा धनुषशी घटस्फोट

पद निश्चित; पदसंख्या अनिश्चित

कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता आरोग्य विभागामार्फत सुरक्षेच्या दृष्टीने १२ विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये पदनाम, शैक्षणिक अर्हता व इतर योग्यता यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असला तरी पदसंख्येचा मात्र उल्लेख टाळण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्या पदासाठी किती उमेदवारांची आवश्यकता आहे, हे स्पष्ट नसल्याने शेकडो बेरोजगार (unemployed)तरुणांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली.

शेकडो इच्छुकांमुळे अर्जांचे ढिग

आरोग्य विभागाच्या कंत्राटी पदभरतीत(contract basis) अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी शेकडो इच्छुकांची गर्दी उसळली. त्यामध्ये युवकांसह युवतींचा समावेश होता. अर्ज करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने अर्जाचे ढिग सीएस कार्यालयात जमा झाल्याचे दिसून आले. त्याची छाननी करण्यात येणार असून पात्र उमेदवारांची नियुक्ती थेट मुलाखतीद्वारे(interview) करण्यात येणार आहे.

Web Title: Crowds Of Unemployed For Contract Basis Jobs In Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top