esakal | Akola : निविदेची घाई करणाऱ्यांवर कारवाई करा!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola : निविदेची घाई करणाऱ्यांवर कारवाई करा!

Akola : निविदेची घाई करणाऱ्यांवर कारवाई करा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कर्मचाऱ्यांसाठी नगरपालिका काळात भाडेपट्टा तत्वावर निवास स्थानाकरिता दिलेल्या जागेचा लिलाव करण्याची घाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली. सभेने सर्व सहमतीने जागेच्या लिलावाबाबत काढण्यात आलेली ई-निविदा स्थगित करण्याचा ठरावही घेतला.

तत्कालीन नगरपालिका व आताच्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या मनकर्णा प्लॉट, शेलार फैल व न.प. कॉलनी येथील सुमारे तीन लाख चौरस फुटापेक्षा अधिक जागेच्या लिलावासाठी ई-निविदा मनपातर्फे काढण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात यातील मनकर्णा प्लॉटबाबत न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उर्वरित दोन जागांबाबत गुरुवारच्या सभेत सत्ताधाऱ्यांसह सर्वांनीच मनपा प्रशासनाला धारेवर धरले.

काँग्रेसचे नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांनी या जागेबाबत महानगरपालिकेला असलेले अधिकार प्रशासन गमावून बसले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. जागेच्या करारनाम्यातच दर तीस वर्षांनी करारनामा नुतनिकरण करण्याचे नमुद आहे. असे असतानाही कर्मचाऱ्यांकडून नुतनीकरणाचे प्रस्ताव येण्यापूर्वीच ई-लिलाव निविदा का काढण्यात आली. कुणाला घाईल झाली होती, असे प्रश्न उपस्थित करून डॉ. झिशान हुसेन यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांच्यासह सर्व पक्षीय सदस्यांनी ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय महापौर अर्चना मसने यांनी घेतला.

जागा नावावर करून देण्याचा प्रस्ताव पाठवणार

भाजपचे नगरसेवक माजी महापौर विजय अग्रवाल यांनी न.प. व शेलार फैल जागेबाबत शासनाकडे रहिवासी असलेल्या नागरिकांच्या नावाने जागा करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. तसा प्रस्तावही त्यांनी सभेत ठेवला. त्यालाही मंजुरी देण्यात आली. भाजपचे नगरसेवक बाळ टाले यांनी भाटेपट्टा आधिच वाढविला असल्याने पुन्हा वाढविण्यास मनाई केली.

भाजप गट नेत्यांकडून कारवाईची मागणी

न.प. कर्मचाऱ्यांसाठी दिलेल्या जागेवर मणर्कणा प्लॉट येथे अपार्टमेंट बांधण्याता आल्याचे भाजपचे गटनेते राहुल देशमुख यांनी सभागृहाच्या लक्षात आणून देत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

loading image
go to top