esakal | धक्कादायक; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Corona News 27 more students from Government Medical College tested positive

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जीएमसीतील पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांचा आकडा ५२ वर गेला आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे सर्वच वर्ग बंद करण्यात आले आहे.

धक्कादायक; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जीएमसीतील पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांचा आकडा ५२ वर गेला आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे सर्वच वर्ग बंद करण्यात आले आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील १८ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले होते. असे असतानाही महाविद्यालयातर्फे अभ्यासवर्ग सुरूच ठेवण्यात आले. दुसऱ्याच दिवशी आणखी सात रुग्ण पॉझिटिव्ह आले.

हेही वाचा - Corona Update : पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी

मंगळवारी रात्री करण्यात आलेल्या चाचणी आणखी २७ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाविद्यालय प्रशासनातर्फे अभ्यासवर्ग बंद करण्यात आले. या सर्व रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?

सर्वच विद्यार्थीचा प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. महाविद्यालयातील ५२ विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याने आता दर चार दिवसांनी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

loading image