esakal | भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Coronas fears are growing Addition of 90 new patients among the positive patients

 कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त ९० नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची स्ख्या ७४६ झाली आहे. त्यासोबतच मृतकांची संख्या ३४२ वर पोहचली आहे.

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त ९० नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची स्ख्या ७४६ झाली आहे. त्यासोबतच मृतकांची संख्या ३४२ वर पोहचली आहे.

कोरोना संसर्ग तपासणीचे ५३१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४४१ अहवाल निगेटिव्ह तर ९० अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी ८७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २४ महिला व ६३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मूर्तिजापूर येथील १५, जीएमसी येथील १३, तापडीया नगर येथील सहा, जठारपेठ येथील पाच, डाबकी रोड व गोडबोले प्लॉट येथील प्रत्येकी चार, बाळापूर येथील तीन, गोरक्षण रोड, राम नगर, न्यू तापडीया नगर, बोरगाव मंजू, रणपिसे नगर व न्यायाधीश वसाहत येथील प्रत्येकी दोन,

हेही वाचा - राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

तर उर्वरित अकोट, हिवरखेड ता. तेल्हारा, राधाकिसन प्लॉट, रेल्वे स्टेशन, नागपूर रोड, सिंधी कॅम्प, गुडधी, माळीपुरा, गवलीपुरा, सहकार नगर, कारंजा ता. बाळापूर, दत्त कॉलनी, पील कॉलनी, केशव नगर, जैन चौक, न्यू तारफैल, वाशिंबा, मलकापूर, म्हैसांग, कौलखेड, गणेश नगर, प्राजंली नगर, मोठी उमरी, दक्षता रोड व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहे. सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन महिला व एक पुरुषाचा समावेश असुन ते विमल नगर मलकापूर येथील दोन तर जीएमसी येथील एक याप्रमाणे रहिवाशी आहे.

हेही वाचा - जिल्हा बँक निवडणुक; मतदार अज्ञातस्थळी; उमेदवारीचा गुंता कायम

२७ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक तर होम आयसोलेशन येथून १५ असे एकूण २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा - अकोल्यात प्रथमच शॉर्ट फिल्म फेस्टिवल स्पर्धा

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - १२१५४
- मृत - ३४२
- डिस्चार्ज - ११०६६
- ॲक्टिव्ह रुग्ण - ७४६

संपादन - विवेक मेतकर

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

हेही वाचा - 

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

loading image