Akola: मतदार यादीत घोळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Voter-List

अकोला : मतदार यादीत घोळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या परीने कामाला लागले आहेत. त्यातूनच मतदार याद्यांमधील घोळ पुढे आले आहे. गेले काही वर्षांपासून मतदार यादीतील नाव एका मतदान केंद्रावरून दुसऱ्या मतदार केंद्रावर बदल करण्याची प्रक्रियाच ठप्प आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत अनेक अडचणी येण्याची शक्यत आहे. ते बघता मनपा निवडणुकीपूर्वी याद्या दुरुस्तीचे काम होईल का, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश सचिव मदन भरगड यांनी उपस्थित केला आहे.

पश्चिम विधानसभेच्या मतदार यादीमध्ये अनेक त्रुटी असल्याची बाब भरगड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून मांडली. या त्रुटीचा परिणाम येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होणार आहे. सरकार व निवडणूक विभाग प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी खूप प्रयत्न करते. कोट्यवधी रुपयाचा खर्च जनजागृतीवर केला जातो. पण मतदानाची टक्केवारी वाढत नाही.

हेही वाचा: Farm Bills: 'तो अहवाल सार्वजनिक करा'; अनिल घनवट यांची सुप्रीम कोर्टाकडे मागणी

मतदानाची टक्केवारी कमी होण्यामागे मतदारांचे निरुत्साह हेच एकमेव कारण नाही. मतदार यादीतील त्रुटी व त्यामुळे मतदारांची होणारी गैरसोय याबाबीही प्रामुख्याने जबाबदार आहे. दर वर्षी हजारो नागरिक नवीन घर बांधणे, भाड्याचे घर बदलणे अशा अनेक कारणामुळे घर, मोहल्ला बदलत राहतात. या नागरिकांच्या मतदार यादीमधील घरचे पत्ते बदलणे, मतदान केंद्र बदलण्याकरिता निवडणूक आयोगाकडून फॉर्म क्रमांक आठ ‘अ’ ची व्यवस्था केलेली आहे. मागील दीड वर्षांपासून हे फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर प्रोसेस होत नसल्याने मतदारांना याचा त्रास होतो. म्हणून हजारो मतदातांच्या घर, मोहल्ला बदलल्यानंतर ही जुन्याच मतदार यादीमध्ये नाव कायम राहते.

त्यांच्या राहत्या नवीन मोहल्याच्या मतदार यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट होत नसल्यामुळे असे हजारो नागरिक मतदानापासून वंचित राहतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयोगाने फॉर्म आठ ‘अ’च्या ऑनलाईन प्रोसेसची समस्या लवकरात लवकर दूर करावी. ही समस्या अकोला शहरापूर्तीच नसून पूर्ण महाराष्ट्र राज्यात असल्याने याकडे प्रामुख्याने मुख्य निवडणूक आयोगाने लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्या पासून वंचित राहणार नाही, याकडेही भरगड यांनी लक्ष वेधले. मतदार यादीतील या त्रुटी निवडणूक आयोगाने मनपा निवडणुकीपूर्वी दुरुस्त करून अद्यावत यादी तयार करण्याची मागणी भरगड यांनी केली आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

एकच नाव तीनवेळा

नाव बदलची प्रक्रियाही बंद

मनपा निवडणुकीपूर्वी होणार का दुरुस्ती?

प्रदेश सचिवांचा निवडणूक आयोगाला प्रश्न

डिजिटल ओळपत्राचे वाटप नाही!

निवडणूक आयोगाने हाती घेतलेला डिजिटल ओलखपत्राचा कार्यक्रम पूर्णपणे राबविलेला दिसून येत नाही. अद्याप ही अनेकांची डिजिटल ओळखपत्रे मतदाराना मिळालेली नाही. अकोला महानगरपालिकेत नवीन गावे जोडले गेल्याने त्यांची अपडेट डिजिटल मतदान ओळखपत्रे मिळालेली नाही. नेमके ओळखपत्र बनवण्यासाठी कुठे जावे याबाबत प्रशासनाने जनजागृती केली नसल्याने, मतदान ओळखपत्र बनवून घेण्यात मतदारांची धावपळ होताना दिसत आहे.

मतदार यादीतील प्रमुख चुका!

- भिंतिला भिंत लागून राहण्याऱ्या नागरिकांचे व एका परिवारांच्या सर्व सदस्याचे नाव एकामागे एक नाहीत.

- मतदार ज्या परिसरातील मतदार आहे, त्या परिसरातील मतदार केंद्रवर नाव नाही तर अनेक किलोमीटर लांबवरील मतदान केंद्रावरील यादीत नाव आढळले.

- एकाच नावाने व एकच छायाचित्र असलेली नावे एकापोठापाठ एकाच यादीत आहे.

- एकाच कुटुंबात राहणाऱ्या नागरिकांचे नावे दोन वेगवेगळ्या प्रभागातील यादीत आहे.

loading image
go to top