Akola Crime : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी

परस्पर विरोधी तक्रारीवरुन गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी
Akola Crimesakal

Vidharbha News : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन एक जण जखमी झाल्याची घटना चान्नी पोलिस स्टेशनअंतर्गत मंगळवारी (दि. 28) घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून काही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास निसार हा मोबीनच्या घराजवळ आला व काही कारण नसताना त्याने शिवीगाळ सुरु केली. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊन हाणामारीला सुरुवात झाली. सदर घटनेची माहिती निसारच्या कुटुंबियांना कळाल्यानंतर त्यांनी मोबीनच्या घरात घुसून महिलांना मारहाण केली. या भांडणामध्ये दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. दरम्यान मोबीनने वसीमच्या डोक्यात काठी मारली.

क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी
Akola Crime: धक्कादायक! धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन तरुणाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, तरुणाचा मृत्यू

यामध्ये वसीम जखमी झाला आहे. दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. भांडणाचे मूळ कारण काही दिवसांपूर्वी मोबीन याच्या भाचीचे लग्न होते. त्यामध्ये एक बैल कापणार असल्याची माहिती वसीमने पोलिसांना दिल्याचा संशय आल्यावरुन दोघांमध्ये भांडण झाल्याचे बोलले जात आहे.

याप्रकरणी फिर्यादी वसीम खान जावेद खानच्या तक्रारीवरुन शेख मोबिन शेख मुसा, शेख मोहसीन शेख मुसा, शायदा बी शेख मुसा, मोबिनची पत्नी यांचेविरुद्ध तर फिर्यादी शहिदा बी शेख मुसा यांच्या तक्रारीवरुन निसार खान जाहेद खान, जावेद खान जाहिद खान, वसीम खान उर्फ चुहा, सय्यद सलीम स. रोशन, सय्यद असिफ स. युसूफ, नाजीरा बी जाहेद खान, निसार खानची अकोला येथे राहणारी बहीण यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर याप्रकरणी पोलिसांनी शेख मोबिन शे. मुसा, मोहसीन शे. मुसा, जावेद खान जाहिद खान, सय्यद सलीम स. रोशन यांना ताब्यात घेतले आहे.

क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी
Nagpur Crime: गप्पा मारत असताना क्षुल्लक कारणावरुन पेटला वाद, मेहुण्याने केला जावयाचा खून

सोमवारी निघाल्या होत्या तलवारी

सोमवारी सायंकाळी आलेगाव मध्ये दारू विक्रीची माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली होती तलवारी निघाल्या याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी चान्नी पोलिसात देण्यात आल्या होत्या मात्र काही तासांनी प्रकरण आपसात करण्यात आले दरम्यान मंगळवारी एकाच समाजातील गावंडगाव येथील काहीजण शिल्लक कारणावरून आपसात भिडले होते हे प्रकरण चान्नी पोलिसात पोहोचले होते. चान्नी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा या लोकांनी गोंधळ घातला मात्र काही वेळाने समाजातील एका पोलीस जमदाराच्या मध्यस्थीने हे प्रकरण आपसात करण्यात आले.

क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी
Nashik Crime: कोळीवाडा भागात 2 गटात तुंबळ हाणामारी; दगडफेकीमुळे तणाव, 3 जण जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com