esakal | मुलाच्या आत्महत्येनंतर बापानेही केली आत्महत्या, आर्मीत भरती होऊ न शकल्याने गायवाड्यातच लावला गळफास
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News crime After the suicide of his son, his father also committed suicide.

बार्शीटाकळी तालुक्यातील शिंदखेड मोरेश्वर येथील शेतकरी संजय सहदेव नवलकर यांच्या कुटुंबात एक मुलगा एक मुलगी पत्नीसह आनंदाने राहत होते, त्यांचा मुलगा रोहित संजय नवलकार वय २१ याला लहानपणापासून मिलिटरी मध्ये भरती होण्याची खुप इच्छा होती त्यानुसार त्यांनी मेहनतही केली होती.

मुलाच्या आत्महत्येनंतर बापानेही केली आत्महत्या, आर्मीत भरती होऊ न शकल्याने गायवाड्यातच लावला गळफास

sakal_logo
By
संजय वाट

बार्शीटाकळी (जि.अकोला):  तालुक्यातील शिंदखेड मोरेश्वर येथील शेतकरी संजय सहदेव नवलकर यांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्या घराशेजारील गायवाड्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

बार्शीटाकळी तालुक्यातील शिंदखेड मोरेश्वर येथील शेतकरी संजय सहदेव नवलकर यांच्या कुटुंबात एक मुलगा एक मुलगी पत्नीसह आनंदाने राहत होते, त्यांचा मुलगा रोहित संजय नवलकार वय २१ याला लहानपणापासून मिलिटरी मध्ये भरती होण्याची खुप इच्छा होती त्यानुसार त्यांनी मेहनतही केली होती.

हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार

परंतु, त्यांचा हात फॅक्चर झाल्याने हातात रॉळ टाकल्याने तो मिलटरी भरती होऊ शकला नाही. त्या विवेचनातून त्यांनी काही दिवसांपूर्वीच राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती, त्याच्या असा निघून जाण्याने संपुर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यातुन  त्यांचे वडिल संजय सहदेव नवलकार हे सावरु शकले नाहीत.

त्यांनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास घराजवळील गायवाड्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या असा दोघा बापलेकांच्या दुःखद आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे,

हेही वाचा - पाचशे रुपये द्या अन्यथा बाळ देणार नाही, प्रसुती झालेल्या महिलेची रुग्णालयाकडूनच अडवणूक

आधी मुलगा व नंतर पती गेल्याने एक आई आपल्या मुलाला व पतीला मुकली व एक मुलगी जी आपल्या बाबाला व भावाला मुकली आहे.  संजय सहदेव नवलकार यांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेल्या पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रार्थना केली.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image