esakal | सख्या बहिणींनाच गंडा; वडिलोपार्जित जमीन मिळविण्यासाठी बहिनीच बदलल्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Crime News sisters cheated; Sisters changed to get ancestral land!

गावातील वडिलोपार्जित जमीन स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी बहिणी असल्याचे भासवून तोतया महिला उभ्या केल्यात. बनावट आधार कार्डच्या सहायाने दोन खऱ्या वारस असलेल्या बहिणींचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न केला.

सख्या बहिणींनाच गंडा; वडिलोपार्जित जमीन मिळविण्यासाठी बहिनीच बदलल्या!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

बार्शीटाकळी (जि.अकोला) : तालुक्यातील भागाई खेर्डा या गावातील वडिलोपार्जित जमीन स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी बहिणी असल्याचे भासवून तोतया महिला उभ्या केल्यात. बनावट आधार कार्डच्या सहायाने दोन खऱ्या वारस असलेल्या बहिणींचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात खऱ्या बहिणींची तक्रार प्राप्त होताच गुरुवारी दुय्यम निबंधक बार्शीटाकळी यांनी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की , भागाई खेर्डा परिसरातील सदांशिव कुटुंबातील मुख्य देवराव सदांशिव यांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेवर कायद्याने त्यांच्या अर्धांगिनी आणि मुला-मुलींचा हक्क होता. परंतु देवराव सदांशिव यांच्या निधनानंतर मुलगा राजपाल , कीर्तीराज, आई अंजनाबाई आणि मुलगी अनिता यांची वडिलोपार्जित संपत्तीवर नजर फिरल्याने त्यांनी त्यांच्या दोन्ही बहिणी मीना आणि सुनीता यांचे आधारकार्ड व फोटो वापरीत बनावट साक्षीदारांच्या सहाय्याने तोतया महिलांना उभे करत दोन्ही बहिणींचा हक्क हिरावत बनावट हक्क सोडण्याचा लेख दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केला.

हेही वाचा - Corona Update : पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी

सदर प्रकरणाची माहिती मिळताच गुरुवारी दोन्ही बहिणींनी अकोला गाठत दुय्यम निबंधक कार्यालय बार्शीटाकळी येथे याबाबत चौकशी केली आणि ज्यावेळी हे हक्क सोडणी लेख नोंदणीकृत करण्यात आले, त्यावेळी आपण उपस्थित नव्हतो. ज्या महिला आपल्या जागेवर उभ्या केल्या आहेत त्या बनावट आहेत, ही बाब दुय्यम निबंधक यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याच प्रमाणे सदर नोंदणीवरील सह्या सुद्धा बनावट असल्याचे त्यांनी तेथे सांगितले. हे सर्व कटकारस्थान आपल्या भावाने आईने आणि बहिणीने रचले असून, आपल्याला वडिलोपार्जित संपत्तीचा हक्क मिळू नये याकरिता केले असल्याची तक्रार यावेळी दोन्ही बहिणी मीना आणि सुनीता यांनी दुय्यम सहनिबंधक बार्शीटाकळी यांच्याकडे केली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत भा. स. गुळवे दुय्यम निबंधक बार्शीटाकळी यांनी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात संबंधिताविरुद्ध तक्रार केली आहे.

हेही वाचा - धोका वाढला; शाळा, शिकवणी २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

यांच्या विरुद्ध केली तक्रार !
या गंभीर प्रकरणी भा. स. गुळवे दुय्यम निबंधक बार्शीटाकळी यांनी अंजनाबाई देवराव सदांशिव, राजपाल देवराव सदांशिव, कीर्तीराज देवराव सदांशीव, अनिता रमेश निशानराव तसेच साक्षीदार सागर भगत आणि विजय खंडारे यांच्याविरुद्ध बार्शीटाकळी पोलिसात तक्रार दिली आहे.

प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक !
या प्रकरणी संबंधित कटकारस्थान रचणाऱ्यांनी खऱ्या वारस असलेल्या मुली मीना आणि सुनीता यांच्यासह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाच्या सुद्धा डोळ्यात धूळफेक केली असल्याचे दिसते.

हेही वाचा -  रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?

खेर्डा भगाई येथील काही लोकांनी तोतया बहिणी उभ्या करून हक्क सोडणी बनावट लेख तयार केले. या बाबत दोन्ही बहिणींनी माझ्याकडे तक्रार केली. त्या बाबत बार्शीटाकळी पोलिस स्टेशनला साक्षीदार व दोन तोतया बहिणीसह पाच जणांना विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
-भा. स. गुळवे, दुय्यम निबंधक, बार्शीटाकळी

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

loading image