esakal | नीमा अरोरा  महानगरपालिकेच्या पहिला महिला आयएएस आयुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Political News Neema Arora Municipal Corporations first woman IAS Commissioner

 महानगरपालिका आयुक्तपदी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. त्यात अकोला महानगरपालिकाला महिला आयएएस अधिकारी मिळाल्या आहेत. मात्र, आयुक्त संजय कापडणीस यांची बदली कुठे करण्यात आली याबाबत माहिती मिळू शकली नाही.

नीमा अरोरा  महानगरपालिकेच्या पहिला महिला आयएएस आयुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगरपालिका आयुक्तपदी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. त्यात अकोला महानगरपालिकाला महिला आयएएस अधिकारी मिळाल्या आहेत. मात्र, आयुक्त संजय कापडणीस यांची बदली कुठे करण्यात आली याबाबत माहिती मिळू शकली नाही.

हेही वाचा - महानगरपालिकेची पोटनिवडणूक एप्रिल-मेमध्ये,  तीन जागांसाठी मतदार याद्यांची तयारी सुरू

अकोला महानगरपालिकेचे आयुक्त संजय कापडणीस यांच्या बदलीबाबत गेले दोन महिन्यांपासून चर्चा सुरू होती. अखेर बुधवारी राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. त्यात जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांचाही समावेश आहे.

हेही वाचा -  अफलातून प्रयोग; आता रस्त्यावर धावणारपाण्यावर चालणारी मोटसरायकल

त्यांना अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. ते विद्यमान आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडून पदभार घेतील. सन २०१३ मध्ये आयएएस परीक्षेत ५० वे मानांकन मिळविणाऱ्या नीमा अरोरा यांना प्रथम परीविक्षाधिन अधिकारी म्हणून नंदुरबारमध्ये नियुक्ती मिळाली होती.

हेही वाचा - आईवडीलांना सांभाळा, अन्यथा ३० टक्के पगार वळविणार!

त्यानंतर त्यांची ३ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हा परिषदेत जालना येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात जालना जिल्हा परिषदेने अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविलेत. त्यानंतर आता त्यांना बुधवार, ता. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी अकोला महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून नियुक्ती मिळाली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप

वाचा -  21 वर्षांत चार नाही तर चौदा झालेत सरपंच 

वाचा -  बातमी वाऱ्यासारखी पसरली; ऐंशी फुट खोल विहिरीत घडलं काय?

वाचा -   शैक्षणिक शुल्काची पठाणी वसुली, शिक्षक विनापगार; शाळा बंद शुल्क सुरू

वाचा -    सरपंचांची आरक्षण सोडत; 26 ओबीसी, 25 खुले, 28 एससी तर आठ एसटी प्रवर्गतील होणार गावकारभारी