अकोला : चिंता नको! विदेशातून आलेले सर्व ‘निगेटिव्ह’

मनपाकडून करण्यात आल्या २७ नागरिकांच्या चाचण्या
अकोला : चिंता नको! विदेशातून आलेले सर्व ‘निगेटिव्ह’

अकोला : जगभर कोरोनाचा नवीन व्हेरियन्ट ओमीक्रॉन दशहत पसरतवित असल्याने अकोल्यापर्यंतही ही विषाणू येण्याची चिंता प्रशासनासोबतच नागरिकांनाही लागली होती. मात्र, तुर्तास तरी चिंता करण्याची गरज पडणार नाही. विदेशातून आलेल्या २७ नागरिकांना महानगरपालिका प्रशासनातर्फे शोध घेवून त्यांची कोरोना चाचणी केली. हे सर्व नागरिक ‘निगेटिव्ह’ आल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.

महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. जावळे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, महानगरपालिका क्षेत्रात ‘हर घर दस्तक’ अभियान राबविले जात आहे. यामार्फत प्रत्येक घरी जाऊन लसीकरणाबाबत माहिती घेतली जात असून, ज्यांनी घेतली नाही त्यांना लस देण्याची व्यवस्था केली जात आहे. याच दरम्यान, विदेशातून अकोला शहरात आलेल्‍या एकूण २७ नागरिकांची कोरोना चाचणी करण्‍यात आली. त्‍या सर्वांचा चाचणी अहवाल निगेटिव्‍ह आला असल्याची माहिती डॉ. जावळे यांनी दिली. त्यामुळे प्रशासनासोबतच नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

अकोला : चिंता नको! विदेशातून आलेले सर्व ‘निगेटिव्ह’
पुन्‍हा महाभारत अटळ; सज्‍ज राहा!

दुसरा डोज ५५ टक्के नागरिकांना

अकोला शहराची एकूण चार लाख ५२ हजार २५७ लोकसंख्‍या असून, यामधून १८ वर्षे वयोगट वरील तीन लाख ३२ हजार ४०९ नागरिक आहेत. त्यापैकी दोन लाख ९३ हजार ९०९ म्‍हणजे ८८.४२ टक्‍के लाभार्थ्‍यांनी कोरोना लसीचा पहिला डोज घेतला आहे. दोन्ही डोज घेणाऱ्या नागरिकांची संख्या एक लाख ६५ हजार ६७४ म्‍हणजे ५२.२५ टक्‍के आहे.

२८० दिव्यांंगांना लस

अकोला मनपात एकूण दोन हजार ५३२ दिव्‍यांग लाभार्थ्‍यांची आहेत. यामधून पहिला डोस घेतल्‍याचे १४० दिव्‍यांग लाभार्थी आणि दोन्ही डोज घेतलेले २८० लाभार्थ्‍यांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र मनपाच्‍या दिव्‍यांग कक्ष येथे सादर केले आहे. दिव्‍यांग लाभार्थ्‍यांना आजपर्यंतच्‍या उदर निर्वाह भत्‍ता देण्‍यात आला आहे. जे लाभार्थी लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ शकत नाही अशा लाभार्थ्‍यांना त्‍यांच्‍या घरी जाऊन लस देण्‍याचे कामाला सुरूवात करण्‍यात आली आहे.

अकोला महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व सोई-सुविधांचा लाभ देण्‍यात येत असून, कोणत्‍याही व्‍यक्‍तीला किंवा दिव्‍यांग लाभार्थ्‍यांना मनपाव्‍दारा देण्‍यात येणाऱ्या सोई-सुविधा आणि मनपात नोंद असलेल्‍या दिव्‍यांग लाभार्थी यांचा उदर निर्वाह भत्‍ता व ईतर सेवा लसीकरणासाठी थांबविण्‍यात आलेल्‍या नाही, असे मनपा उपायुक्‍त डॉ.पंकज जावळे यांनी सांगितले.

४० पथकांची हर घर दस्तक

मनपा हद्दीत हर घर दस्‍तक उपक्रमांतर्गत एकूण 40 पथके कार्यान्‍वित करण्‍यात आले होते. ज्‍यामध्‍ये १६० आशा वर्कर, २३० आरोग्‍य विभागातील कर्मचारी, ७० शिक्षक आणि १३० आंगणवाडी सेविका यांचा समावेश होता. या चमुव्‍दारे शहरातील प्रत्‍येक घरी कोरोना लसीकरणाची दस्‍तक देत घराजवळ असलेल्‍या कोरोना लसीकरण केंद्रांवर घेऊन जाऊन लसीकरण करवून घेतले. ता. १ ते ७ डिसेंबर २०१२ पर्यंत कोरोना संक्रण झालेले एकूण सात नागरिक आढळले. अकोला शहरात पॉझिटिव्‍हीटी दर ०.२ टक्‍के आहे.

अकोला शहरातील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिंबंधात्‍मक उपाययोजनांचा काटेकोरपणे पालन करून कोरोना लसीचे दोन्‍ही डोज घेऊन आपले व आपल्‍या परिवाराचे संरक्षण करावे.

- डॉ.पंकज जावळे, उपायुक्‍त, मनपा, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com