अकोला : अतिवृष्टीचे ५४.७२ कोटी तहसीलदारांच्या खात्यात!

लवकर मिळणार मदत; नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याचा मार्ग प्रशस्त
fund
fundsakal

अकोला : जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांसाठी ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांचा मदत निधी शासनाने मंजुर करून जिल्हा प्रशासनाला दिला आहे. सदर निधी जिल्हा प्रशासनाने सातही तालुक्यातील तहसीलदारांच्या खात्यात वर्ग केला आहे. त्यामुळे निधीचे वितरण लवकरच संबंधित नुकसानग्रस्तांच्या बॅंक खात्यात करण्यात येणार असून नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात २१ जुलैच्या रात्री ७ वाजतापासून एकसारखा पाऊस कोसळला होता. पावसाचा जोर रात्री २ वाजेपर्यंत कायम राहिल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २६ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील ३९९ गावे बाधित झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचे कपडे, घरातील साहित्य, अन्न धान्य व इतर नुकसान झाले होते. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी उद्भवलेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना, मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना, जखमी व्यक्तींना तातडीने मदत देणे आवश्यक असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. नुकसानग्रस्तांसाठी आवश्यक असलेल्या मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांचा मदत निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन दिला असून त्याचे आता लवकरच वाटप करण्यात येणार आहे.

fund
दक्षिण मुख्यालयातर्फे लघुपट व चित्रकला ऑनलाइन स्पर्धा

शासनाने अशी दिली आहे मदत

नैसर्गिक आपत्तीमुळे घरे पूर्णतः क्षतीग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी, वस्तुंकरिता अर्थ सहाय्य - २ कोटी ५६ लाख ५ हजार रुपये.

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यामुळे जणावरांचा मृत्यू झालेल्यांना एसडीआरफच्या दराने ३९ कोटी २८ लाख तर वाढीव दराने १२ कोटी ३४ लाख रुपयांची अशी एकूण ८ कोटी ५६ हजार ६ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पूर्णतः नष्ट, अंशतः पडझड झालेली कच्ची, पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्‍यांसाठी एसडीआरफच्या दराने ८ कोटी ५६ लाख ६ हजार तर वाढीव दराने मदत देण्यासाठी १० कोटी ४३ लाख ५६ हजार रुपयांचे असे एकूण १८ कोटी ९९ लाख ६२ हजार रुपयांचे अनुदान जाहीर झाले आहे. खरडून गेलेल्या शेती नुकसानीसाठी ३१ कोटी ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. हस्तकला, हातमाग कारागिर, बारा बलुतेदार यांना एसडीआरफच्या दराने १६ लाख तर वाढीव दराने १ कोटी ८४ लाख अशी एकूण २ कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पूर व पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्यांसाठी १ कोटी ३० लाख ५० हजार तर टपरीधारकांसाठी २३ लाख ५० हजार, कुक्कुटपपालन शेडच्या नुकसानीसाठी ५ लाख, मदत छावणीमध्ये आश्रय घेतलेल्यांसाठी ४ कोटी ८३ लाख मदत जाहीर करण्यात आली आहे.

तालुक्यांना असा दिला मदत निधी

तालुका निधी

अकोला ४३०१.७७

बार्शीटाकळी १८०.९९

अकोट १७४.२

तेल्हारा ४९.८१

बाळापूर ७६२.०५

पातूर ०.१५

मूर्तिजापूर ३.२

एकूण ५४७२.१७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com