अकाेला : १८७ उमेदवारांचे भवितव्य बंद; उद्या मतमोजणी

मतदारराजाने आपला काैल कुणाला दिला, याकडे सर्वांचे लक्ष
Akola Political News
Akola Political News sakal

अकाेला : जिल्हा परिषद-पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (ता. ५) जिल्ह्यातील ४८८ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळी ७.३० वाजतापासून संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात मतदान झाले. काही मतदान केंद्रांवर मतदान रात्री ६ वाजेपर्यंत सुद्धा मतदानाची प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेच्या १४ गटांसाठी (सर्कल/मतदारसंघ) ६८ तर पंचायत समितींच्या २८ गणांसाठी रिंगणात असलेल्या १८७ उमेदवारांचे भवितव्य मतदानानंतर यंत्रबंद (ईव्हीएम) झाले. मतमोजणी बुधवारी (ता. ६) होणार असल्याने मतदारराजाने आपला काैल कुणाला दिला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Akola Political News
कोव्हॅक्सिनच्या जागतीक मान्यतेवर आज निर्णय नाही, आठवडाभर लांबणीवर!

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी प्रवर्गातील जागा रिक्त झाल्यामुळे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. जिल्ह्यातील ४८८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीतरित्या पार पडावी यासाठी निवडणूक विभागामार्फत चाेख व्यवस्था करण्यात आली हाेती. ग्रामीण भागात दुपारनंतर मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी जेमतेम होती, परंतु दुपारनंतर त्यात वाढ झाली. सकाळी ७.३० वाजतापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चाललेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांचा उत्साह वाखाणण्या जाेगा हाेता. वृद्धांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावून लाेकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला. दरम्यान पोटनिवडणुकाच्या निकालाची मतमोजणी बुधवारी (ता. ६) सकाळी १० वाजतानंतर करण्यात येणार आहे.

या ठिकाणी मतमोजणी

  • तेल्हारा ः नवीन इमारत तहसिल कार्यालय

  • अकोट ः कृषि उत्पन्न बाजार समिती कास्तकार भवन

  • मूर्तिजापूर ः शासकीय धान्य नवीन गोडाऊन

  • अकोला ः शासकीय धान्य गोदाम जिल्हाधिकारी कार्यालय परिसर

  • बाळापूर ः शासकीय धान्य गोदाम

  • बार्शीटाकळी ः पंचायत समिती सभागृह

  • पातूर ः पंचायत समिती सभागृह

राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडे लक्ष

  • जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत भाजप, वंचित बहुजन आघाडी स्वबळावर आहे. दोन्ही पक्षांच्या वतीने सर्व जागांसाठी उमेदवारांनी निवडणूक लढवली.

  • शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी आहे. ९ जागांवर शिवसेनेच्या तर ५ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली.

  • कॉंग्रेसने स्वबळावर असून जिल्हा परिषदेच्या १४ पैकी १२, तर पंचायत समितीच्या २८ पैकी २३ जागी उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे.

  • प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सुद्धा ३ उमेदवारांनी पोटनिवडणूक लढवली.

उमेदवारांच्या विजयावर सत्तेचे समीकरण

जिल्हा परिषदेच्या १४ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीअंतर्गत मतदानाची प्रक्रिया मंगळवारी (ता. ५) पार पडली. या रिक्त जागांमधून सर्वाधिक सदस्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडावी यासाठी महाविकास आघाडीचे सदस्य असलेल्या राजकीय पक्षांनी जोरदार प्रयत्न केले. त्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार प्रचार केला. जिल्हा परिषदेत गत अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या वंचित बहुजन आघाडीला सुद्धा गढ राखण्यासह बहुमताने विजय मिळवण्याची संधी या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे. जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्यासाठी महाविकास आघाडीला नऊ सदस्य निवडून आणावे लागणार आहेत, तर वंचितचे दहा सदस्य निवडून आल्यास त्यांना बहुमतासह सत्ता राखता येणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या विजयावर सत्तेचे समीकरण राहणार आहे.

तालुकानिहाय असे झाले मतदान

तालुका ९.३० पर्यंत ११.३० पर्यंत १.३० पर्यंत ३.३० पर्यंत

तेल्हारा ७.४९ १६.८९ २८.४९ ४३.८२

अकोट ३.६७ १५.९५ ३८.७५ ४६.०५

मूर्तिजापूर ४.०१ २६.३६ ४३.०९

अकोला ७.०१ १६.७२ २७.९७ ४२.०३

बाळापूर ६.२९ १५.२५ २५.७९ ४१.२७

बार्शीटाकळी ८.१९ १७.५९ २८.८७ ४१.२३

पातूर ८.२१ १७.८७ २८.७१ ४५.०२

--------------------------------------------------------------------

एकूण ६.४६ १६.२२ २९.३१ ४३.१७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com