सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीनंतर सदस्यांची पळवापळवी

Akola GramPanchayat News After the reservation of Sarpanchpada the members fled
Akola GramPanchayat News After the reservation of Sarpanchpada the members fled
Updated on

बाळापूर (जि.अकोला) : तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाची महीला आरक्षण सोडत झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांना विविध आमिषे दाखविले जात आहेत. पळवापळवीने गावच्या सामूहिक जीवनात बिघाड होण्याची शक्यता आहे.


तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीत सदस्य पळवापळवीचा प्रकार सुरू झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अपवाद वगळता येथे कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.

बहुतांश ठिकाणी दुशंकू स्थिती निर्माण झाल्याने सर्वच्या सर्व सदस्यांना मोठे महत्त्व आले आहे. त्यात सरपंच पदाची आरक्षण सोडत निवडणूकी नंतर झाल्याने अनेक पॅनल प्रमुखाची गाडी रुळावरून घसरली आहे त्यामुळे सर्वांना खुश ठेवण्यासाठी पॅनल प्रमुख आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत.

कोणत्याही गटाला बहुमत नसूनही सरपंच आमचाच होणार या इराद्याने पळवापळवी सुरू केली आहे. सदस्यांना प्रलोभने दाखवून त्यांना पळविण्याचा प्रकार सुरू असल्याचे तालुक्यातील प्रत्येक गावात दिसत आहेत .

तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतवर येणार महीलाराज
ग्रामपंचायत महीला सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज बुधवारी जाहीर झाली आहे. महीला आरक्षण जाहीर होताच तालुक्यातील गावा- गावात आता सरपंच पदाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कोणाला कशी संधी मिळणार याचीच चर्चा ऐकायला मिळत आहे. तालुक्यातील ६४ पैकी ३४ सरपंचपदाच्या जागा महीलांच्या वाट्याला असल्याने गावातील दिग्गजांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे.


अनुसुचीत जाती महिला ११, अनुसूचित जमाती महीला १, नामाप्र महीला ९, सर्वसाधारण १२, सर्वसाधारण महीला १३ जागा महीलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
अनुसुचीत जाती महीला :
हसनापूर, शेळद, टाकळी खोजबळ, उरळ खुर्द, कसूरा, निंबी, काजीखेड, गायगाव, सांगवी जोमदेव, नया अंदुरा, देगाव,

अनुसुचीत जमाती महीला : मोरगाव सादीजन

हेही वाचा - शैक्षणिक शुल्काची पठाणी वसुली, शिक्षक विनापगार; शाळा बंद शुल्क सुरू

नामाप्र महीला : कोळासा, कवठा, कारंजा रम, जोगलखेड, हाता, टाकळी निमकर्दा, खामखेड, शिंगोली, कळंबी महागाव,

सर्वसाधारण महिला : पिंपळगाव, डोंगरगाव, भरतपूर, मनारखेड, सागद, मांडोली, सोनाळा, कुपटा, बारलींगा, नकाशी मोखा, बोरगाव वैराळे, मोरझाडी

(संपादन - विवेक मेतकर)

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com