esakal | सरपंचांची आरक्षण सोडत; 26 ओबीसी, 25 खुले, 28 एससी तर आठ एसटी प्रवर्गतील होणार गावकारभारी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Political News GramPanchayat Sarpanch Election Reservation AC, ST OBC Open

 तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत सोमवारी (ता. १) येथील तहसील कार्यालयात काढण्यात आली. यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २६ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३५ सरपंच पद आरक्षित ठेवण्यात आले.

सरपंचांची आरक्षण सोडत; 26 ओबीसी, 25 खुले, 28 एससी तर आठ एसटी प्रवर्गतील होणार गावकारभारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  :  तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत सोमवारी (ता. १) येथील तहसील कार्यालयात काढण्यात आली. यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २६ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३५ सरपंच पद आरक्षित ठेवण्यात आले.

ग्रामविकास विभागाने यापूर्वी काढलेल्या अनुसूचित जाती व जमातींच्या सरपंच पदाच्या आरक्षणात बदल न करण्याच्या सूचना केल्याने तालुक्यातील या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणात बदल करण्यात आला नाही.

हेही वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप

सन् २०२० ते २०२५ दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले होते. परंतु ग्रामविकास विभागाच्या १६ डिसेंबर २०२० रोजीच्या पत्रान्वये ज्या जिल्ह्यांमध्ये सरपंचपदाची आरक्षण सोडत कार्यक्रम यापूर्वी राबविण्यात आल्याने सदर प्रक्रिया रद्द करुन नव्याने घेण्याचा आदेश दिला होता.

त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी यापूर्वी निश्चित केलेले आरक्षण रद्द करुन सन् २०२० ते २०२५ दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अकोला तहसील कार्यालयात ग्रामपंचायतींमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींकरीता सरपंचाची पदे आरक्षित करण्यात आली.

हेही वाचा - 21 वर्षांत चार नाही तर चौदा झालेत सरपंच, हिवरखेडचे सरपंचपद पुन्हा ठरणार औट घटकेचे?

यावेळी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणात बदल न करण्याच्या सूचना केल्यामुळे नागरिकांच्या मागास प्रवर्गासह सर्वसाधारण प्रवर्गासाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण सोडतीची प्रक्रिया अकोला तहसील कार्यालयात उपविभागाय अधिकारी डॉ. निलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे व नायब तहसीलदार घुगे यांच्या उपस्थिती काढण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व इतर उपस्थित होते.

हेही वाचा - जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणूक; डॉ. संतोष कोरपे यांच्यासह ७ संचालक अविरोध, ११ उमेदवारी अर्ज नामंजूर

नामाप्रसाठी आरक्षित सरपंच पदं
कपिलेश्वर, टाकळी जळम, कानशिवणी, दहिगाव गावंडे, कापशी तलाव, कासली खुर्द, सिसा बोंदरखेड, निंभोरा, डोंगरगाव, बोरगाव मंजु, वैराट, राजापूर, अन्वी, कुरणखेड, कळंबेश्वर, धोतर्डी, काटी, मोरगाव भाकरे, कुंभारी, आखतवाडा, मिर्झापूर, रामगाव, कंचनपूर, आपोती बु., मजलापूर, निपाणा, कानडी.

हेही वाचा - VIDEO: अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना शहरात फिरू देणार नाही-मनसे

सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती
म्हातोडी, कट्यार, अमानतपूर, येळवण, कौलखेड गोमासे, सांगवी मोहाडी, सांगळूद बु., पाळोदी, चांदुर, खडका, दोनवाडा, दापूरा, म्हैसांग, मासा, कापशी रोड, देवळी, उगवा, म्हैसपूर, गोरेगाव खु, बोरगांव खुर्द, सुकळी नंदापूर, खरप खुर्द, वडद, माझोड, धामणा, गांधीग्राम, अंबिकापूर, पातूर नंदापूर, दुधाळा, एकलारा, लोणाग्रा, चांगेफळ, पैलपाडा, सांगवी खुर्द, कौलखेड जहां.

हेही वाचा - भीषण अपघात; कुत्र्याला वाचववताना कारचा झाला चुराडा

अनुसूचित जातीसाठी आरक्षित पद
लाखोंडा बु., अनकवाडी, आपातापा, मारोडी, आगर, गोपालखेड, सुकोडा, गोरेगांव बु., निराट, दहिहांडा, लाखनवाडा, येवता, बाभुळगाव, कोळंबी, निंबी मालोकार, बादलापूर, वरूडी, सोनाळा, कोठारी, यावलखेड, हिंगणी बु., नवथळ, खडकी टाकळी, भोंड, बिरसिंगपूर, तामशी, दुधलम, रोहणा.

क्लिक करा - अकोला जिल्ह्यातील बातम्या

अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ग्रा.पं.
घुरस, वणी, पळसो बु., वाशिंबा, दोडकी, चिखलगाव, खांबोरा, भौरद.

(संपादन - विवेक मेतकर)