Akola Lok Sabha Election: धोत्रे, पाटील व आंबेडकर यांच्यात होणार थेट लढत; फडणवीसांच्या मध्यस्थीने गव्हाणकरांची माघार

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघासाठी दाखल १७ अर्जापैकी दोन व्यक्तींनी आपले अर्ज मागे घेतले. भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने अखेर नारायण गव्हाणकर यांनी सोमवारी अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने तिरंगी लढत निश्चित झाली.
Akola Lok Sabha Election
Akola Lok Sabha ElectionSakal

Akola News : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघासाठी दाखल १७ अर्जापैकी दोन व्यक्तींनी आपले अर्ज मागे घेतले. भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने अखेर नारायण गव्हाणकर यांनी सोमवारी अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने तिरंगी लढत निश्चित झाली.

भाजपाचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात थेट लढत होत आहे. त्यांच्यासह एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. अकोला लोकसभा निवडणूकीसाठी अगदी सुरुवातीपासूनच सर्वांचीच उत्कंठा लागली आहे.

केवळ जिल्हयाचेच नव्हेतर राज्याचेही लक्ष या निवडणूकीकडे आहे. शेवटपपर्यंत वंचितला महाविकास आघाडीची साथ मिळू शकली नाही. त्यामुळे काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या रुपात उभा केला.

भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण गव्हाणकर यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने आणखीनच चुरस वाढली होती. पण अखेर शेवटच्या दिवशी फडणवीसांच्या फोनने चित्र पालटले.

गव्हाणकरांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता भाजपा, काँग्रेस व वंचितच्या उमेदवारात थेट लढत निश्चित झाली आहे. चिन्हवाटपासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीला उमेदवारांसह निवडणूक सामान्य निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन, स्पेसिफाईड सहायक निवडणूक अधिकारी डॉ. शरद जावळे आदी उपस्थित होते.

अशी मिळाली चिन्हे

बैठकीत सिलेंडर या चिन्हाची मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), व शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लिग) या दोन्ही उमेदवारांकडून करण्यात आल्याने ‘ड्रॉ’ काढण्यात आला. त्यात हे चिन्ह शेख नजीब शेख हबीब यांना मिळाले. तर ॲड. प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले.

अनुप धोत्रे (भारतीय जनता पार्टी) कमळ, डॉ. अभय पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) पंजा, काशिनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी) हत्ती, बबन सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी) टीव्ही, मुरलीधर पवार (अपक्ष, फलंदाज), मो. एजाज मो. ताहेर (अपक्ष, जहाज), धर्मेंद्र कोठारी (अपक्ष, एअर कंडिशनर), अशोक थोरात (अपक्ष, रोडरोलर), रत्नदीप गणोजे (अपक्ष, हिरा), ॲड. उज्ज्वला राऊत (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) ऊस घेतलेला शेतकरी, प्रीती सदाशिव (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) सोशल, गॅस शेगडी अशाप्रकारे चिन्ह मिळालेत.

यांनी घेतला अर्ज मागे

निवडणूकीसाठी दाखल १७ अर्जापैकी भाजपाचे नेते तथा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले नारायण हरिभाऊ गव्हाणकर (अपक्ष) व गजानन साहेबराव दोड (अपक्ष) असे दोन अर्ज आज मागे घेण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com