Akola Loksabha Election : अनुप धोत्रे यांच्या रुपाने भाजपाची युवा उमेदवाराला पसंती

सलग पाचव्यांदा अकोला लोकसभा हा गड अभेद्य ठेवण्यासाठी भाजपने खासदारपुत्र अनुप धोत्रे यांच्या माध्यमातून रणशिंग फुंकले आहे.
Anup Dhotre
Anup Dhotresakal

अकोला - सलग पाचव्यांदा अकोला लोकसभा हा गड अभेद्य ठेवण्यासाठी भाजपने खासदारपुत्र अनुप धोत्रे यांच्या माध्यमातून रणशिंग फुंकले आहे. बोलण्यात, वागण्यात, जनसंपर्क ठेवण्यात वडिलांचाच ठसा असलेले अनुप धोत्रे यांच्या उमेदवारीने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनुप धोत्रे यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढविलेली नसून लोकसभेच्या माध्यमातून पहिलीच निवडणूक ते लढवत आहेत. काही महिन्यापासून ते अकोला लोकसभा निवडणूक प्रमुख आहेत. ऑक्टोबर २०२३ पासून भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

अकोला लोकसभा मतदारसंघस्तरीय महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन त्यांनी यापूर्वी केले आहे. या शिबिरांतून जवळपास ३५ हजार रुग्णांची नोंदणी व तपासणी करण्यात आली होती. २०१४ व २०१९ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी बूथ, नगर व वार्डस्तरांवर बैठका घेऊन त्यांनी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी योगदान दिले आहे.

मुख्यमंत्री चषकाचे आयोजन करून त्यात मोठ्या प्रमाणात युवकांना सहभागी करून घेतले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सोशल मीडिया वॉररूमच्या माध्यमातून मतदान संपर्क अभियान प्रभावीपणे राबविल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे या निवडणूकीत त्यांचे कसब निश्चितच कामाला येवू शकेल.

प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख

प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी (विशेषतः कापूस उत्पादक) म्हणून अनुप धोत्रे यांची जिल्हयात ओळख आहे. अकोला येथील कृषी विज्ञान केंद्राचे सचिव म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. ग्वाल्हेर येथील जीआयसीटीएस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ते सचिव असून त्या माध्यमातूनही त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. ते अभिनव बाल शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. अकोला येथील नीळकंठ सहकारी सूतगिरणीचे संचालक आहेत.

वडिलांच्या पक्षनिष्ठेचे फळ

भाजपाकडून मिळालेली उमेदवारी ही वडिलांच्या पक्षनिष्ठेचे फळ आहे. कार्यकर्त्यांच्या पाठबळाने व जनतेच्या विश्वासाने सलग पाचव्यांदा अकोला लोकसभेचा गड आम्ही काबीज करू हा विश्वास आहे.

- अनुप धोत्रे, उमेदवार, अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com