
जिल्ह्यात शनिवारी (ता. १६) कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी महापालिकेच्या दोन केंद्रांवर १३८ तर जिल्हा स्त्री रुग्णालयात १०० अशा एकूण २३८ फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोनाची लस देण्यात आली.
अकोला : जिल्ह्यात शनिवारी (ता. १६) कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी महापालिकेच्या दोन केंद्रांवर १३८ तर जिल्हा स्त्री रुग्णालयात १०० अशा एकूण २३८ फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोनाची लस देण्यात आली.
मनपाच्या दवाखान्यात कार्यरत स्टाफ नर्स शुभांगी अहीर यांना शहरामधून पहिली लस घेण्याचा मान प्राप्त झाला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. घोरपडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. शिरसाम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारूख शेख यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा
कोरोना विरुद्धची लढाई निर्णयाक स्थितीत पोहचली असून शनिवारी (ता. १६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर अकोला जिल्ह्यात सुद्धा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात झाली. यावेळी स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या हस्ते कोविड लसीकरण कक्षाची फीत कापून लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा - ऐकावे ते नवलंच! या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव
यावेळी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारूख शेख, मनपा आरसीएच ऑफीसर डॉ. अनुप चौधरी, डॉ. विजय चव्हाण, डॉ. मनीषा बोरेकर, डॉ. अजमल खान, डॉ. इमरान कादरी, डॉ. मुस्लीओद्दीन शेख, डॉ. अस्मिता पाठक आणि मनपा वैद्यकीय आरोग्य विभाग तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजाविले.
हेही वाचा - कोरोनाला खवय्येगिरीचा तडका!, फास्टफूड सेंटर, हॉटेल, ढाब्यांवर युवकांची तुफान गर्दी
सायंकाळपर्यंत चालले लसीकरण
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार अकोला महानगरपालिकेतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ऑर्बिट हॉस्पीटल, राम नगर, अकोला या दोन ठिकाणी कोरोना लसीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर सायंकाळपर्यंत लसीकरण सुरू राहिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७१ आणि ऑर्बिट हॉस्पीटल येथे ६७ असे एकूण १३८ मनपा वैद्यकीय आरोग्य विभागातील कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्करांना लस देण्यात आली. जिल्हा स्त्री रुग्णालयात १०० जणांना कोरोनाची लस देण्यात आली.
(संपादन - विवेक मेतकर)