
एरव्ही कोरोना संक्रमनाच्या भितीने लोकांनी बाजारातून भाजीपाला सुद्धा खरेदी करणे टाळले होते. आता मात्र कोरोनाच्या भितीला खवय्येगिरीचा चांगलाच तडका बसल्याचे चित्र असून, शहरात तसेच शहराबाहेरही फास्टफूड सेंटर, हॉटेल, ढाब्यांवर युवकांची चांगलीच गर्दी सध्या पाहायला मिळत आहे.
अकोला : एरव्ही कोरोना संक्रमनाच्या भितीने लोकांनी बाजारातून भाजीपाला सुद्धा खरेदी करणे टाळले होते. आता मात्र कोरोनाच्या भितीला खवय्येगिरीचा चांगलाच तडका बसल्याचे चित्र असून, शहरात तसेच शहराबाहेरही फास्टफूड सेंटर, हॉटेल, ढाब्यांवर युवकांची चांगलीच गर्दी सध्या पाहायला मिळत आहे.
जगभरात कोरोनाने हाहाकार माजविला. भारतातही प्रचंड हाणी झाली. परंतु, या महाकाय संकाटापासून वाचण्यासाठी भारतीयांनी प्रयत्नांचीही परिकाष्ठा केली. त्यामध्ये लॉकडाउनचा सर्वाधिक भूमिका जाणवली. सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आखून दिलेल्या विविध नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी, करवून घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्या.
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक; आपल्या गावकडे येणार का ही महिला अधिकारी ?, तिच्या सौदर्याची सगळीकडेच चर्चा!
त्यामध्ये खासगी व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी पूर्णपणे सहयोग दिला. आर्थिक नुकसान होत असले तरी, खवय्येगिरीला व्यावसायिकांनी पूर्णपणे थांबा दिला होता. शासनाकडून करण्यात आलेल्या अनलॉकनंतर मात्र खवय्येगिरीला हळूहळू पुन्हा जोर धरायला लागला आणि आता तर, फास्टफूड सेंटरस्, हॉटेल्स, ढाब्यावरील गर्दी पाहून कोरोनाचा प्रादूर्भाव संपला की काय, असे वाटायला लागते. देशातील सर्वात मोठ्या व्यवसायाच्या स्वरुपात खवय्येगिरीला म्हणजे हॉटेलींगकडे पाहायला हरकत नाही.
हेही वाचा - विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन?, हिवाळी परीक्षा होणार मार्चम महिन्यात
खवय्येगिरीची येथे चंगळ
दीर्घ कालावधीपासून जीभेला आवर घातल्यानंतर आता पोटोबा मात्र ऐकायला तयार नाही. त्यामुळे पाणीपूरी, कचोरी सेंटरस्, चायनिज सेंटरस्, चहा सेंटरस्, फास्टफूड सेंटरस्, फॅमेली रेस्टॉरंट, रेस्टॉरंटस्, हॉटेल्स, ढाबे यावर युवक वर्गाची चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. युवकांसोबतच आता कौटुबिक मेजवाण्या सुद्धा हॉटेल्सवर रंगत असल्याचे चित्र प्रामुख्याने पाहायला मिळत आहे.
व्यावसायिकांची जबाबदारी मात्र वाढली
नागरिकांकडून जरी आता आवश्यक तेवढी काळजी घेतली जात नसली तरी, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी खानावळ सेंटरस्, हॉटेलस् चालविणाऱ्या व्यावसायिकांना घ्यावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सोशल डिस्टंंन्सिंग पाळण्याची सूचना करण्यापासून सॅनिटायझेशन, हॅडवाश व मास्क वापरण्याबाबत जागृकता ठेवावी लागत आहे. त्यासाठी प्रत्येक व्यावसायिक, त्यांचेकडील कर्मचारी यांना आधी कोविड १९ साठी प्रशासनाने घातलेल्या नियामांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागत आहे आणि तशी अंमलबजावणी सुद्धा होत असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - लसीची तयारी सुरू तरीही कोरोनाची भीती कायमच, नव्याने आढळले 38 पॉझिटिव्ह रुग्ण
नागरिकांनी सुद्धा करावे नियमांचे पालन
कोरोनावरील लस अजूनपर्यंत सर्व सामान्यांपर्यंत पोहोचलेली नसून, कोरोनाचे संकटही पूर्णपणे संपलेले नाही. अजूनही रुग्ण संख्येचा आकडा फुगताच असून, कोरोनामुळे जाणारी बळींची संख्याही वाढती आहे. त्यामुळे कोरोना संकट अजूनही संपले नसून, त्यापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने आवश्यक ती काळजी घेत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
(संपादन - विवेक मेतकर)