
मनपा प्रशासनाने कोविडचे कारण देत, जनता भाजी बाजारातील भाजीपाला लिलाव व ठोक विक्रीला बंदी घालण्याच्या आदेशासह भाजीपाला दुकानदारांना नोटीस बजावली आहे. मात्र कोविडच्या नावाखाली यात राजकारण होत असून, या विरुद्ध आवाज उठवित प्रसंगी कास्तकार व दुकानदार आंदोलन करणार असल्याची माहिती महात्मा फुले, फळ भाजीपाला अडत दुकान असोसिएशनचे अध्यक्ष हाजी सज्जाद हुसेन यांनी दिली.
अकोला : मनपा प्रशासनाने कोविडचे कारण देत, जनता भाजी बाजारातील भाजीपाला लिलाव व ठोक विक्रीला बंदी घालण्याच्या आदेशासह भाजीपाला दुकानदारांना नोटीस बजावली आहे. मात्र कोविडच्या नावाखाली यात राजकारण होत असून, या विरुद्ध आवाज उठवित प्रसंगी कास्तकार व दुकानदार आंदोलन करणार असल्याची माहिती महात्मा फुले, फळ भाजीपाला अडत दुकान असोसिएशनचे अध्यक्ष हाजी सज्जाद हुसेन यांनी दिली.
हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री
लोणी रस्त्यावरील भाजीपाला विक्रेता संघटनेने जनता भाजी बाजारातील भाजी व्यावसायिकांवर केलेल्या अवैध हर्रासी आरोपांच्या खुलाशासंदर्भात व मनपा प्रशासनाने दिलेल्या नोटीसेबाबत माहिती देण्यासाठी महात्मा फुले, फळ भाजीपाला अडत दुकान असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (ता.७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच
यावेळी असोसिएशनचे सचिव सुनील ढोमणे, उपाध्यक्ष प्रकाश बालचंदानी, सहसचिव गजानन देवर, कोषाध्यक्ष किशोर ढोमणे, सतीश पाटील, अर्शद हुसेन, रवि वाधवानी आदी पदाधिकारी उपस्थित होते. माहिती देताना हुसेन म्हणाले की, ५० वर्षांपासून जनता भाजी बाजारात भाजी व्यवसाय होत असून, कोविड महामारीत कोविड रुग्ण परिसरात निघाल्यामुळे प्रशासनाच्या विनंतीनुसार भाजापाला व्यावसायिक तात्पुरते व्यवसायासाठी गावाच्या बाहेर गेले.
संस्थेच्या वतीनेही पातूर रस्त्यांवर नव्या बाजाराची निर्मिती करून नागरिकांची व कास्तकार, अडते आदींची व्यवस्था येथे करण्यात आली. मनपा प्रशासनाने जनता बाजार व्यावसायिकांनी सोडावा असे कोणतेही लेखी आदेश दिले नाहीत. कोविड अनलॉकनंतर सर्व व्यवहार सुरळीत होत असताना व्यावसायीक पुन्हा जनता भाजी बाजारात येऊन सेवा करू लागले.
हेही वाचा - आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’
मात्र रात्री कोणत्याही प्रकारचे भाजीपाला लिलाव व ठोक विक्री येथए होत नाही, केवळ सकाळी विक्री सुरू असते. येथे काळाबाजार, कास्तकारांची आर्थिक लूट, मालाची नासधूस, माल कमी भरवणे, अव्वाच्या सव्वा दराने विक्री असले प्रकार चालत नाहीत. लोणी रस्त्यावरील भाजीपाला व्यावसायिकांनी या जनता बाजाराला अवैध म्हणून उपोषण केले. येथील दुकाने ही फार जुनी वहिवाटीची असून, ती उच्च न्यायालयाच्या न्यायकक्षेत आहेत. उच्च न्यायालयाने प्रशासनास या संदर्भात दुकानदारांचे हीत जोपासून योग्य निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
प्रशासन जेव्हा जनता भाजी बाजाराच्या विकासासाठी बाहेर पाठवेल तेव्हा नियमाप्रमाणे सर्व भाजी व्यावसायीक पातूर रस्त्यावरील नव्या भाजी बाजारात स्थानांतरीत होती. मात्र सध्या मनपाने बजावलेल्या नोटीस अन्यायकारक असून, त्याला विरोध दर्शवित प्रसंगी आंदोलन सुद्धा करू, असी माहिती सज्जाद हुसेन यांनी दिली.
(संपादन - विवेक मेतकर)