कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ४९ नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 1 February 2021

 कोरोना संसर्गामुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याव्यतिरीक्त ४९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे सध्या जिल्ह्यात कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण ७१८ झाले आहेत. दरम्यान मृत्यूमुखी पडलेला रुग्ण शिवणीवारपूर, अकोट येथील ७५ वर्षीय पुरुष आहेत. त्यांना ३० जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

अकोला : कोरोना संसर्गामुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याव्यतिरीक्त ४९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे सध्या जिल्ह्यात कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण ७१८ झाले आहेत. दरम्यान मृत्यूमुखी पडलेला रुग्ण शिवणीवारपूर, अकोट येथील ७५ वर्षीय पुरुष आहेत. त्यांना ३० जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

कोरोना संसर्ग तपासणीचे रविवारी (ता. ३१) २४४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १९५ अहवाल निगेटिव्ह तर ४९ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १५ महिला व ३४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, गोरक्षण रोड येथील तीन, डाबकी रोड, मोठी उमरी, कौलखेड, मिट क्लासेस व पैलपाडा येथील प्रत्येकी दोन,

हेही वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप

तर उर्वरित लहान उमरी, बाळापूर, बोरगाव मंजू, पिंपले नगर, शेलू बोंडे मूर्तिजापूर, न्यू तापडीया नगर, राम नगर, गायगाव बाळापूर, कौलखेड जहांगीर, आंबेडकर नगर, पातूर, कपिलवस्तू नगर, गजानन पेठ, एमजी रोड, भंडारज बु., रणपिसे नगर, शास्त्री नगर, वैकेटेश नगर, ज्योती नगर, सिंधी कॅम्प, कोठारी वाटिका, विवरा कॉलनी, तापडीया नगर, म्हैसपूर, छावा व राम मंदिर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवाशी आहे.

हेही वाचा - Union Budget 2021: अर्थसंकल्पात सरकारला करावी लागेल उधळपट्टी - अर्थतज्ञ संजय खडक्कार

१७ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, आयकॉन हॉस्पिटल येथून चार, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, अवघते हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून चार, अशा एकूण १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा - जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणूक; डॉ. संतोष कोरपे यांच्यासह ७ संचालक अविरोध, ११ उमेदवारी अर्ज नामंजूर

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ११६१८
- मृत - ३३६
- डिस्चार्ज - १०५६४
- ॲक्टिव्ह रुग्ण - ७१८

क्लिक करा - अकोला जिल्ह्यातील बातम्या

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Another dies due to corona; 49 new positives