
राज्यात ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून शासनाने सरपंच पदाचे आरक्षणाला स्थगिती दिली आहे. सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीत निवडणूक लढवायची असेल तर नवीन नियमानुसार जो उमेदवार 1 जानेवारी 1995 किंवा त्यानंतर जन्मला असेल त्या उमेदवाराला 7 वी पास असणे आवश्यक राहणार आहे.
डोणगाव (जि.बुलडाणा) : राज्यात ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून शासनाने सरपंच पदाचे आरक्षणाला स्थगिती दिली आहे. सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीत निवडणूक लढवायची असेल तर नवीन नियमानुसार जो उमेदवार 1 जानेवारी 1995 किंवा त्यानंतर जन्मला असेल त्या उमेदवाराला 7 वी पास असणे आवश्यक राहणार आहे.
राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली आहे. तत्पूर्वी निवडणूक विभागाने सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले होते. परंतु निवडणूक जाहीर झाल्या नंतर आरक्षणाला स्थगिती दिली आहे.
हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार
त्यामुळे प्रमुखाचा हिरमोड झाला आहे.सध्या तालुक्यात 64 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून सध्या इच्छुकांची कागदपत्र जुळवा जुळव चालू आहे.निवडणूक आयोगाच्या नियमतानुसार 21 वर्षा वरील व्यक्तीस निवडणूक लढविता येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकी नंतर सदस्यांमधूनच सरपंच निवडला जाईल असा निर्णय शासनाने घेतला आहे. आत्ता नवीन नियमानुसार ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असेल तर ज्या व्यक्तीचा जन्म 1 जानेवारी 1995 अथवा त्या नंतर झाला असेल आणि जिला या कलम 3 च्या 13 च्या सुधारणे नुसार या अधिनियमाखाली आत्ता किमान 7 वr पासचे अथवा समतुल्य शैक्षणिक अर्हता असल्या खेरीज सरपंच म्हणून निवडणूक लढविता येणार नाही, अशी माहिती मेहकर निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे.
हेही वाचा - पाचशे रुपये द्या अन्यथा बाळ देणार नाही, प्रसुती झालेल्या महिलेची रुग्णालयाकडूनच अडवणूक
त्यामुळे भविष्यात अशिक्षित उमेदवाराचे सदस्य होण्याचे अथवा ग्रामीण भागातील राजकारण्यांचे सर्व अधिकार आपल्या हातात ठेवण्याचे स्वप्न भंगणार आहे. या निर्णयाने भविष्यात येणारे उमेदवार हे शिक्षित असणार आहे.
(संपादन - विवेक मेतकर)