शिक्षक कॉलनीमध्ये घरफोडी करून दोन लाखांचा ऐवज केला लंपास!

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 18 January 2021

हरातील शिक्षक कॉलनी स्थित असलेल्या संतोष सरकटे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी रोख रक्कम, सोने-चांदी व मोटरसायकल सह दोन लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना १५ जानेवारीच्या मध्यरात्री घडली असल्याचा अंदाज  व्यक्त करीत आहेत. ही घटना  रविवारी (ता.१७) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

मालेगाव  (जि.वाशीम) :  शहरातील शिक्षक कॉलनी स्थित असलेल्या संतोष सरकटे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी रोख रक्कम, सोने-चांदी व मोटरसायकल सह दोन लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना १५ जानेवारीच्या मध्यरात्री घडली असल्याचा अंदाज  व्यक्त करीत आहेत. ही घटना  रविवारी (ता.१७) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत संतोष कमकाजी सरकटे यांनी १७ जानेवारी रोजी मालेगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. या  मध्ये त्यांनी नमूद केले की, १४ जानेवारी रोजी ते परिवारासह  हिंगोली जिल्ह्यातील समगा या त्यांच्या मूळ गावी गेले होते. यादरम्यान १५ जानेवारीच्या रात्री त्यांच्या कंपाऊंड गेट व दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी घरामध्ये प्रवेश करून घरातील लोखंडी कपाट फोडले.

हेही वाचा - अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा

त्यामधील लहान  मुलाच्या सोन्याचे आभूषणे, सोन्याच्या अंगठ्या वजन ७ ग्रॅम, सोन्याचे तीन गोप वजन १७ ग्रॅम, कानातील वेल वजन पाच ग्रॅम, चांदीचे  मुलाचे कडे, बलदंड व पैजण अंदाजे ५०० ग्रॅम, रोख रक्कम अंदाजे ९५ हजार  रुपये, मोटारसायकल  क्रमांक एम.एच. ३८ एम ५५३५ किंमत अंदाजे ४० हजार रुपये, असा एकूण अंदाजे दोन लाख पाच हजारच्यावर ऐवज लंपास केला.

हेही वाचा - ऐकावे ते नवलंच! या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव

मालेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंह सोनोने यांनी घटनास्थळी पाहणी करून फिंगरप्रिंट  पथका द्वारे तपासणी केली. अज्ञात आरोपींविरुद्ध मालेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार सिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलिस करीत आहेत. 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News- A burglary in Shikshak Colony and theft of Rs 2 lakh