
भाजपने महानगरपालिका निवडणुकीत गाजावाजाकरून महापालिका हद्दीत शहर बस सेवा सुरू केली होती. मात्र कोरोना काळात ठप्प झालेल्या शहर बसची चाके पुन्हा सुरूच झाली नाही. त्यामुळे ऑटोचालकांचे आयतेच फावले असून, दामदुप्पट दर आकारारून अकोलेकरांची लुट सुरू झाली आहे.
अकोला : भाजपने महानगरपालिका निवडणुकीत गाजावाजाकरून महापालिका हद्दीत शहर बस सेवा सुरू केली होती. मात्र कोरोना काळात ठप्प झालेल्या शहर बसची चाके पुन्हा सुरूच झाली नाही. त्यामुळे ऑटोचालकांचे आयतेच फावले असून, दामदुप्पट दर आकारारून अकोलेकरांची लुट सुरू झाली आहे.
अकोला महानगरपालिका झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात बस सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर काही वर्षांतच त्याला घरघर लागली. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये नव्याने बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा - ‘मुख्यमंत्री साहेब, पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या’, वाशिमच्या युवकाचं थेट मुख्यमंत्र्यांना भन्नाट पत्र
त्यासाठी नागपूर येथील कंपनीला कंत्राटही देण्यात आले. त्यानंतर १५ बस महानगरपालिकेच्या सेवेत दाखल झाल्यात. ता. ३१ मार्च २०१८ पूर्वीच या बस मनपाला मिळाल्या होत्या. मात्र निवडणुकीच्या काळ असल्याने सेवा सुरू होऊ शकली नव्हती.
अखेर १ एप्रिल २०१८ रोजी विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व शहरातील भाजपचे दोन्ही आमदारांच्या उपस्थितीत शहर बस वाहतूक सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. दोन वर्षांपेक्षाही कमी कालावधीतच या शहर बस वाहतूक सेवेला घरघर लागली. प्रशासन व सत्ताधाऱ्यांमधील नियोजनाअभावी कोरोना संकटकाळात ठप्प झालेली शहर वाहतूक बस सेवा पुन्हा सुरूच होऊ शकली नाही.
हेही वाचा - सख्खा भाऊ पक्का विरोधक, ग्रामपंचायतच्या निवडणूकीत लावली प्रतिष्ठा पणाला
तिकिट वाढीचा प्रश्नावर अडले घोडे
शहर बस वाहतूक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटदार कंपनीला प्रवाशांच्या तिकिटांचे दर वाढवून हवे होते. कंपनीने बँकेकडून घेतलेले कर्ज, वाहक व चालकांच्या वेतनाचा खर्च व बस गाड्यांची देखभाल दुरुस्तीचा खर्च परवड नसल्याने बस सेवेचे तिकिट वाढवून देण्याची मागणी कंत्राटदार कंपनीकडून करण्यात आली होती. त्याबाबत प्रशासन व सत्ताधारी यांच्यासोबत कंत्राटदार कंपनीसोबत चर्चाही झाली. मात्र तिकिट दर वाढ होत नसल्याने व त्याशिवाय बस सेवा सुरूळीत ठेवणे परवडत नसल्याने कंपनीने हात वर केल्याची माहिती आहे.
(संपादन - विवेक मेतकर)