esakal | कोरोनाचे नवे ४८ रुग्ण पॉझिटिव्ह, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहचली ५८२ वर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Corona 48 new patients positive, the number of active patients reached 582

कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाचे जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ८) ४८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५८२ झाली असून मृतकांची संख्या ३२३ झाली आहे.

कोरोनाचे नवे ४८ रुग्ण पॉझिटिव्ह, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहचली ५८२ वर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाचे जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ८) ४८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५८२ झाली असून मृतकांची संख्या ३२३ झाली आहे.

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड रोगाने जिल्ह्यात मार्च-एप्रिल महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे. कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. ८) ४२९ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३८१ अहवाल निगेटिव्ह तर ४८ अहवाल पॉझिटिव्ह आले.

हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली!, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर

दरम्यान दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नऊ जणांना, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून एक, आयकॉन हॉस्पीटन येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून पाच, तसेच होम आयसोलेशन पूर्ण झालेल्या पाच, अशा एकूण २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री

या भागात आढळले नवे रुग्ण
सकाळी ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २१ महिला व २३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सिंधी कॅम्प व डाबकी रोड येथील प्रत्येकी चार, गोरक्षण रोड व जिल्हा परिषद कॉलनी येथील प्रत्येकी तीन, न्यू खेतान नगर, गीता नगर, लहरीया नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अकोट, कौलखेड, उमरा ता. अकोट, देऊळगाव ता. पातूर, पीडीकेव्ही हॉस्टेल, बाजोरीया ले-आऊट, राधाकिसन प्लॉट, कॉग्रेस नगर, शांती नगर, मुंगशी, न्यु राधाकिसन प्लॉट, खेतान नगर, लक्ष्मी नगर, कच्ची खोली, न्यु हिंगणा वाशिम रोड, न्यु तापडीया नगर, गांधी चौक, व्हीएचबी कॉलनी, श्रद्धा नगर, कपीलवस्तु नगर, गणेश नगर, रामदास पेठ, तारफैल व हिंगणा रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहेत. याव्यतिरीक्त सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोट येथील तीन, तर गोरक्षण रोड येथील एक याप्रमाणे रहिवाशी आहे.

हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह अहवाल - १०८२२
- मृत - ३२३
- डिस्चार्ज - ९९१७
- ॲक्टिव्ह रुग्ण - ५८२

(संपादन - विवेक मेतकर)

loading image