कोरोनाचा धोका कायमच, आणखी एकाचा मृत्यू; ३२ नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 20 January 2021

 कोरोना संसर्गामुळे मंगळवारी (ता. १९) एका रुग्णाचा मृत्यू झाला. याव्यतिरीक्त ३२ नवे रुग्ण आढळले. त्यासोबतच ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यापर्यंत आता कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ३२९ झाली आहे.

अकोला : कोरोना संसर्गामुळे मंगळवारी (ता. १९) एका रुग्णाचा मृत्यू झाला. याव्यतिरीक्त ३२ नवे रुग्ण आढळले. त्यासोबतच ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यापर्यंत आता कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ३२९ झाली आहे.

कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. १९) जिल्ह्यात ३७६ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३४४ अहवाल निगेटिव्ह तर ३२ अहवाल पॉझिटिव्ह आले.

हेही वाचा - पोलिसांच्या मध्यस्थिने पुन्हा जुळल्या ‘रेशीमगाठी’

त्यासोबतच एका रुग्णाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सदर रुग्ण डाबकी रोड, अकोला येथील ६५ वर्षीय महिला होती. तिला ८ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. दरम्यान पॉझिटिव्ह आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये सकाळी १७ महिला व १२ पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळले.

हेही वाचा - राज्य शासनाच्या आदेशाने महानगरपालिकेतील तीन वर्षातील ठराव गोळा करण्याची लगबग सुरू

त्यातील मूर्तीजापूर येथील चार, गणपती मंदिर, रामनगर व संत नगर प्रत्येकी तीन, अमानका प्लॉट, अकोट व जठार पेठ येथील प्रत्येकी दोन उर्वरित गोकुळ कॉलनी, सरस्वती नगर, रचना कॉलनी, डाबकी रोड, हिंगणा फाटा, वसंत टॉकीज, आदर्श कॉलनी, बंजारा नगर, राधाकिसन प्लॉट व शिवनी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवाशी आहे. सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश असून दोन सिंधी कॅम्प तर एक खडकी येथील रहिवाशी आहे.

हेही वाचा - शहरातील सर्व दवाखान्याचे होणार फायर ऑडिट

३२ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून मंगळवारी १०, आयकॉन हॉस्पिटल येथून सात, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तर होम आयसोलेशन येथून ११ अशा एकूण ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ११२०१
- मृत - ३२९
- डिस्चार्ज - १०२७३
- ॲक्टिव्ह रुग्ण - ५९९

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Coronas threat forever, death of another; 32 new positives