esakal | कोविड लस झाली दाखल, पाच जिल्ह्यात ७० हजार डोस मिळणार!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News- Covid vaccine has been received, 70,000 doses will be available in five districts!

जिल्ह्यात शनिवारपासून राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी कोविड लस पुण्यातून अकोल्यात दाखल झाली आहे. अकोला मंडळात येणाऱ्या पाच जिल्ह्यासाठी ७० हजार डोस प्राप्त होणार असून, त्यापैकी पहिल्या टप्प्प्यासाठी नऊ हजार डोस प्राप्त झाले आहेत. दुसऱ्या टप्प्प्यासाठी महिनाभरानंतर डोस प्राप्त होतील.

कोविड लस झाली दाखल, पाच जिल्ह्यात ७० हजार डोस मिळणार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : जिल्ह्यात शनिवारपासून राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी कोविड लस पुण्यातून अकोल्यात दाखल झाली आहे. अकोला मंडळात येणाऱ्या पाच जिल्ह्यासाठी ७० हजार डोस प्राप्त होणार असून, त्यापैकी पहिल्या टप्प्प्यासाठी नऊ हजार डोस प्राप्त झाले आहेत. दुसऱ्या टप्प्प्यासाठी महिनाभरानंतर डोस प्राप्त होतील.


जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे कोविड लसीकरणाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. बुधवारी सकाळीच पुण्याहून अकोल्याकडे लसीचे डोस रवाना करण्यात आले होते. अकोल्यात दाखल झाल्यानंतर आरोग्य व जिल्हा प्रशासनाने त्याचे क्लोड स्टोरेजमध्ये ठेवण्याची व्यवस्था पूर्वीच केली होती. आहे.

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक; आपल्या गावकडे येणार का ही महिला अधिकारी ?, तिच्या सौदर्याची सगळीकडेच चर्चा!

याच दरम्यान बुधवारी सकाळी पुण्याहून जवळपास ७० हजार कोविड लशीचे डोस अकोल्यासाठी रवाना झाल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. या लशी ठेवण्याची पुर्ण तयारी करण्यात आली आहे.

अकोला मंडळात सर्वाधिक डोस बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांना मिळणार असून, अकोला शहरासाठी नऊ हजार डोस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आहे. लशीचा दुसरा डोस महिनाभरानंतर प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत मिळाली आहे.

हेही वाचा - लसीची तयारी सुरू तरीही कोरोनाची भीती कायमच, नव्याने आढळले 38 पॉझिटिव्ह रुग्ण

पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईन वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविड लसी दिली जाणार आहे. त्यासाठी ७,७८३ पेक्षा जास्त लाभार्थ्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

हेही वाचा - विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन?, हिवाळी परीक्षा होणार मार्चम महिन्यात

जिल्हानिहाय उपलब्ध लस
बुलडाणा - १९,०००
यवतमाळ - १८, ५००
अमरावती - १७,०००
अकोला - ९०००
वाशीम - ६५००

(संपादन - विवेक मेतकर)

loading image