
कोविड-१९ नियंत्रणासाठी लसिकरण सुरू झाले असतानाही जिल्हा परिषदेमार्फत रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम या हाेमिऔपॅथिक गाेळ्या खरेदी सुरू आहे. या मुद्यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत बुधवारी चांगलीच खडाजंगी झाली.
अकोला : कोविड-१९ नियंत्रणासाठी लसिकरण सुरू झाले असतानाही जिल्हा परिषदेमार्फत रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम या हाेमिऔपॅथिक गाेळ्या खरेदी सुरू आहे. या मुद्यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत बुधवारी चांगलीच खडाजंगी झाली.
काेराेनाचे संकट अद्याप संपलेले नसून, ग्रामीण भागात लस पाेहाेचण्यात ७-८ महिने लागणार असल्याचे स्पष्टी करण देत सत्ताधाऱ्यांनी आरोग्य विभागाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?
काेराेना विषाणू कोविड -१९ च्या नियंत्रणासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हाेमिओपॅथिक गाेळ्यांचे वितरण नागरिकांना आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.
आर्सेनिक अल्बम या गाेळ्यांचे वितरण माेफत करण्यात आले. आता काेराेनावर थेट लसच देण्यात येत असतानाच काही दिवसांपासून या गाेळ्यांच्या खरेदीसाठी जि.प.कडून हालचाली करण्यात येत आहे.
हेही वाचा -शेतात गव्हाच्या पिकाची जागल करण्याकरिता गेले अन् अचानक केला बिबट्याने हल्ला
याचे पडसाद ता. २० जानेवारी राेजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. शिवसेनेचे गट नेते गाेपाल दातकर यांनी खरेदी प्रक्रियेवर आक्षेप घेत गोळ्या खरेदीची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा -या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव
यावर सत्ताधारी पक्षाचे गट नेते ज्ञानेश्वर सुलताने यांनी प्रक्रिया शासन निर्देशानुसारच सुरू असल्याचे सांगितले. सभेला अध्यक्षा प्रतिभा भाेजने, उपाध्यक्षा सावित्री राठाेड, शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, सभापती मनिषा बाेर्डे, अाकाश िसरसाट, पंजाबराव वडाळ, सदस्य गजानन पुंडकर, डाॅ. प्रशांत अढाऊ, मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते.
हेही वाचा -लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्याने लढविली ग्रामपंचायतची निवडणूक, निकाल तर पहा
सिटी स्कॅन मिशनची मागणी
आर्सेनिक अल्बम या गाेळ्यांऐवजी प्राथमिक आराेग्य केंद्रात सिटी स्कॅन मशिनची व्यवस्था करण्याची मागणी शिवसेनेचे गट नेते गाेपाल दातकर यांनी केली. त्यावर सिटी स्कॅन मशिन खरेदीचा खर्च व त्यासाठी लागणारे तज्ज्ञ तंत्रज्ञ जि.प.कडे नसल्याचे जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसाेले यांनी सभेत सांगितले.
हेही वाचा -अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा
जूनच्या आदेशाती अंमलबजावणी आता कशी?
आर्सेनिक अल्बम गाेळ्या खरेदीसाठी शासनाने जूनमध्येच आदेश दिला हाेता. या आदेशाची अंमलबजावणी तब्बल सहा महिन्यांनी का करण्यात येत आहे, असा प्रश्न शिवसेनेचे गाेपाल दातकर यांनी उपस्थित केला. त्यावर सत्ताधाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना निधीच उशिरा प्राप्त झाल्याने खरेदीची प्रक्रिया आता राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
(संपादन - विवेक मेतकर)