esakal | 'शहाण्यांनो, चालण्याकरिता रस्ता द्या ! २६ जानेवारीपासून उड्डाणपुलावर होणार गाढवाचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Donkey agitation will be held on the flyover from January 26 at Murtijapur

'शहाण्यांनो चालण्याकरिता रस्ता द्या !' अशी आरोळी ठोकत गाढवाचे धरणे आंदोलन २६ जानेवारीपासून येथील हिरपूर रस्त्यावरील उड्डाणपुलावर सुरू होणार आहे.

'शहाण्यांनो, चालण्याकरिता रस्ता द्या ! २६ जानेवारीपासून उड्डाणपुलावर होणार गाढवाचे आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : 'शहाण्यांनो चालण्याकरिता रस्ता द्या !' अशी आरोळी ठोकत गाढवाचे धरणे आंदोलन २६ जानेवारीपासून येथील हिरपूर रस्त्यावरील उड्डाणपुलावर सुरू होणार आहे.

राष्ट्रशक्ति हमचालीस संघटनेने या आंदोलनाचा इशारा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत एका निवेदनाद्वारे दिला आहे. अमरावती आणि आकोला जिल्ह्यांना जोडणाऱ्या आसरा रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे.

हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच

त्यामुळे हाडांचे व मणक्याचे आजार, अपघात, मृत्यूमुळे जनता त्रस्त आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. लोकप्रतिनिधी उदासीन आहेत. त्यांनी या रस्त्याची अंदाजपत्रकीय तरतूद करवून घेतली नसल्याचे मोठे शल्य आहे. दयनीय अवस्थेतील या रस्त्याऐवजी ग्रामस्थ नाइलाजास्तव लांब अंतराच्या व जोखीमीच्या पर्यायी रस्त्याचा अवलंब करीत आहेत. 

हेही वाचा - आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’

लोकप्रतिनिधींप्रती प्रचंड रोष निर्माण झालेल्या ग्रामस्थांची सहनशिलता संपली आहे. मानवी प्रयत्न थकले आहेत. त्यामुळे आमच्या आंदोलनातून प्रतिकात्मक गाढव 'शहाण्यांनो, चालण्याकरिता रस्ता द्या ! ', असे आवाहन करणार असल्याचे या आंदोलनासंदर्भात हम चालीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव डाबेराव यांनी सांगितले.

हेही वाचा - औरंगाबादचं नामांतर: ठाकरे यांचा शिवसेनेसह मित्रपक्षांना टोला

बबनराव डाबेराव यांच्यासह तालुकाध्यक्ष रोहीत सोळंके, सचिव किशोर सोनोने, विजय राऊत, मोहंमद शहाबुद्दीन, आकबर ठेकेदार व आन्य या धरणे आंदोलनात सहभागी होतील. निवेदनाच्या प्रति केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, जिल्ह्याचे पालकमंत्री, बाळापूर, दर्यापूर व येथील आमदार तसेच ठाणेदारांना पाठविण्यात आल्या आहेत.  

(संपादन - विवेक मेतकर)